अक्षर स्मित   (स्मिता...)
138 Followers · 67 Following

Joined 8 June 2021


Joined 8 June 2021
16 DEC 2022 AT 10:31

सगळं मंजूर केलंय तर तिंबत ठेवणयापेक्षा संपवून टाकावा विषय...कशाला भावनिक गुंतागुंत...
समोरच्याकडून अपेक्षा करताना आपण कितपत त्यांच्या अपेक्षेत खरे उतरतोय ते पहावं....
उगाच आज उद्या करण्यात काय अर्थ



-


14 DEC 2022 AT 19:53

उध्वस्त होण्याची
लागताच चाहूल
दिले सोडून
मंदावला जीवघेणा कोलाहल

-


14 DEC 2022 AT 19:00

इसी में इंसान बेहाल है।
सुकून कम परेशानियां भरमार है।

-


14 DEC 2022 AT 14:25

बस् दिल से पढ़ने वाले,
संजोकर रखनेवाले मिल जाए।
तो जीवन के दो दिन बढ़ जाए।

और यही कमी होती है।

-


17 MAR 2022 AT 15:35

ओए! सोड आता
विश्वास तुझ्यावर आहे माझा
तू झेलशीश‌ हर एक शब्द माझा
पेलशील आनंदाने
मनाचा भार माझ्या

-


17 MAR 2022 AT 15:27

बहर फुलांचा
सांगे ऋतूचे बदलणे
तुझे हसणे
बहरे माझे जीवनगाणे

-


17 MAR 2022 AT 15:00

जिथे तिथे तुझ्या माझ्या आठवणी पेरलेल्या
व्यर्थ सारे प्रयत्न तू नाही विसरू शकणार मला

-


17 MAR 2022 AT 14:50

तु अन् मी
प्रीत फुलपाखरू
अधिर तन
करी चंचल मनाची चाकरी

-


17 MAR 2022 AT 14:45

प्रीत का कधी बंधनात राहते
जेवढ करा बंदिस्त
तेवढी ती उत्कटतेने मुक्त होते
बहरत जाते

-


17 MAR 2022 AT 14:21

गरीबी जबाबदारी घेणं लवकर शिकते
एकटं जगायचंय
पोटासाठी मरायचय
हेही तिला बालवयातच कळते

-


Fetching अक्षर स्मित Quotes