👤 "बाबा" — एक अज्ञात संज्ञा
---
शाळेत 'बाबा'वर निबंध आला,
मी फक्त रिकामं पान पाहत बसलो...
इतर मुले-मुली भरभरून लिहताना,
मी कागदावर रेघोट्या ओढत राहिलो.
लेखन छंद असल्याने लिहलं काही,
मित्रांकडून सतत ऐकलेलं सर्वकाही.
भावनांचा ओलावा त्यात नव्हता,
फक्त शब्दांचा रचलेला थर होता.
कुणीतरी लिहलेलं मी हळूच वाचले —
"बाबांनी हात धरला की सुरक्षित वाटते..."
क्षणात डोळे पाणावले; अश्रू बाहेर पडले,
मग 'आईच्या' चेहऱ्याने हास्य पसरवले.
माझ्यासाठी 'बाबा' ही अज्ञात संज्ञा होती,
एक रिकामी जागा, एक न पाहिलेला घाट...
पण त्याच जागी मायेची सरिता वाहत होती —
माझं आभाळ, माझी सावली, माझी माऊली!
समाजाच्या दृष्टीने ती कमकुवत स्त्री होती,
पण माझ्या दृष्टीने ती सक्षम, कठोर आई होती.
ऊन-पावसाची तमा न बाळगता लढणारी,
माझ्या भविष्यासाठी स्वतःचं वर्तमान जाळणारी...
आई-बाबा दोघांशिवाय अर्धं आयुष्य गेलं,
बाबा नव्हतेच, आणि आईकडे क्षणभर वेळ.
बडबड्या, खोडकर, मी हळूहळू शांत झालो —
दोष कुणाचा नव्हता, ना आईचा, ना बाबांचा...-
अप्रचलित हूं मुझे प्रचलित तो होने दो।
Thank you for your... read more
शोध अंतर्मनाचा
मनाच्या अंतराळी, गर्जे शून्याची चाहूल,
स्वप्नांचे हे सूर्यमंडळ, शोधे अस्तित्वाचे फूल.
शक्य असे सर्वकाही, अशक्यता दम तोडते,
सरता पर्दे नेत्रावरी, आभासी इमारत धासळते.
टीमटीमणाऱ्या आकांक्षा, गर्टेतील महत्वकांशा,
उजळती दाही दिशा नभी, गर्देत हरवते आशा.
थिजलेल्या संवेदना, शोधती उष्णतेचा स्पर्श,
शब्दांना सापडती शेवटी, अंतर्मनातील अर्थ.-
अमूर्त प्रेम
=========
प्रेमाला तराजूत तोलता येत नाही
प्रेम खरे की खोटे मोजता येत नाही
प्रेम काव्य नसते की कथा कोणती
ते अनुभवता येतं, सांगता येत नाही
कधी नजरेच्या गहिऱ्या सागरात सापडते,
कधी अबोल स्पर्शातून मनाला भिडते,
कधी सोबत चालताना शब्द विरळ होतात,
कधी विरहातही त्याचे अर्थ उरात राहतात.
प्रेम हे प्रश्न नसतं, की उत्तर मिळेल,
ते एक न सुटणार कोडं असतं,
ते तर काळाच्या पलीकडे चालतं,
कधी विरूनही अंतर्मनात गाजतं.
प्रेम गाणं नसतं की वाद्याचं सूर,
ते तर हृदयाचा अबोल दस्तुर.
ना काही मागतं, ना काही विचारतं,
निस्वार्थपणे हळू हळू रिते होतं राहतं
म्हणूनच…
प्रेमाला परिभाषा देणे व्यर्थ आहे,
ते ज्याने अनुभवलं, त्याच्यासाठी ते अर्थ आहे.-
सरणावरील वात
फुलताना देखील दरवळतो रक्ताचा सुगंध,
ही मातृभूमीच आहे, न झुकणारा हा बंध.
सीमेपलीकडून येणारे नित्य नवे झंझवात,
आपलेपणाच्या बुरख्यात दडतो विश्वासघात.
नसतो आतंकवादचा कुठला धर्म-जात,
खाकीचा जुना आवडंबर पोकळ युक्तिवाद.
पीडितेचा खोटा आव पकडताच रक्ताचे हात,
माणुसकी धगधगते जणू सरणावरील वात.
विचार ज्यांचा खरा असतो घाटक घातपात,
ना धर्म ना जात उरते, आकारते विकृती मनात.
राजकीय तव्यांवर शिजत असते संधीची डाळ,
उसळतात दंगली आणि मृतांचे आकडे वाढतात.
यहुदी जेथे फुलले, बहरले, इथलेच झाले,
तेथे का मुस्लिमांना असुरक्षित वाटावे?
मंदिरे, मस्जिदे, चर्च, गुरुद्वारे एकसाथ नांदती,
तरी मनांत का दाटते संशयाची सावली?-
I know you’re gone, not mine to hold,
Yet love in me has not grown old.
I breathe your name in every prayer,
Still haunted by the vacant air.
No dreams to steal you from your life,
Just peace, not pain, not storm, not strife.
A moment — not to change your fate,
But speak the words I spoke too late.
No hopes to claim, no pleas, no chain,
Just want to say — I loved through pain.
Through silent years I stayed the same,
You moved ahead, I kept the flame.
No one could fill the space you left,
A quiet heart, yet loud and cleft.
So if you hear this voice one day,
Know love like this won’t fade away.-
हँसी खुशी से गुज़र जाए हर लम्हा-ए-जिंदगी
दरख़्त-ए-सुकूँ नज़र आए हर लम्हा-ए-जिंदगी
बस इतनी सी इबादत है मेरी मालिक-ए-जहाँ से
मुट्ठी में रेत-ए-समय ठहर पाए हर लम्हा-ए-जिंदगी-
लिखते है, मिटाते है
कुछ अपने, कुछ पराए
दर्द जो छिपे गहराई में
दिल के किसी कोने में-
जब तेरा जिक्र होता है महफ़िल-ए-यारों में
तब तेरा चेहरा होता है चष्म-ए-चिरागों में
तसल्ली-ए-दिल को बस इतनी सी रहती है
मुलाक़ात तो होती है शहर-ए-ख्वाबों में-
बदलते जमाने के साथ बदले नहीं हम
उलझे थे फ़सानों में सुलझे नहीं हम
वक्त बेरहम कातिल निकला जनाब
देख कर अदा उसकी फिसले नहीं हम-
सब नुस्खे अजमा लिए न दवा का कोई असर हुआ
इश्क़ के बुखार में आख़िर एक और रांझा बर्बाद हुआ-