हो तुझ्यावर भाळले मी जिंदगी
बंधनांना जाणले मी जिंदगी
भावनांना प्राप्त झाला अर्थही
आपल्यांना जिंकले मी जिंदगी
संकटावर मात केली नेहमी
क्षण सुखाचे वेचले मी जिंदगी
खूप सोपे होत गेले वागणे
मौन जेव्हा पाळले मी जिंदगी
माणसातच श्रीहरीला पाहिले
माणसांना जोडले मी जिंदगी-
Birth date 3rd july. Translator,... read more
पहाटेची रश्मी करून गेली स्पर्श
चराचर उल्हासित आणि मनात हर्ष
हवेची थंड झुळूक देऊन गेली गारवा
गीत ओठात अनेक पण मनात मारवा
-
विश्वासाचा हा वारसा ठेवेन मी जपून
होणार नाही याचा घात कधीही चुकून
घेऊन ये तूही मनातला विश्वास आणि बघ
जोडलेले हात सदैव जोडलेलेच राहतील मग
कुणाच्या सांगण्यानी वाढत नसतो विश्वास
तो तर असतो जगण्यातला तुझा माझा श्वास-
सांगू नको कुणाला ओझे मनातले तू
गोठून ठेव आता ओझे मनातले तू
सांगून ही कुणाला होते कमी कधी ना
टाकून झटक खाली ओझे मनातले तू
-
स्पर्श रेशमी तुझा हवाहवासा
गंधित फुलांचा जणू सहवास
अणूरेणूत असा जपून ठेवावा
जणू आयुष्याचा मखमली ठेवा
-
माणसामुळे यंत्र आहे यंत्रामुळे माणुस नाही
माणुसकीच संपली तर यंत्राला किम्मत नाही-
असाच असूदे हातात हात
आयुष्याची तुझी माझी साथ
ऊन वारा सोसत सोबतीने
संकटावर करू दोघे मिळून मात-
तरही गझल
उला मिसरा मोहन जाधव सर यांचा
मिश्रवृत्त : विद्युन्माला +सती +स्त्री
(आयुष्याशी तोंडी माझा करार झाला आहे)
हासत हसवत जगण्याचा तर विचार झाला आहे
झाले गेले विसरत सारे जगून बघुया आता
थांबव रडणे दुःखाचा बघ उतार झाला आहे
स्वप्नांना बळ देण्यासाठी वडील पाठी भक्कम
साकाराया स्वप्ने मुलगा तयार झाला आहे
धावत असतो मानव नुसता मनात चिंता ठेवत
सावरताना त्याचा गोंधळ चिकार झाला आहे
विश्वासाला जागा नाही जगात कोठे उरली
जगणे म्हणजे नुसता येथे जुगार झाला आहे-
खुशियों का एक आशियाना हो उसमे दिलों का मेल हो
पैसों का कोई खेल ना हो बस एक तेरा साथ हो-
काश कुछ तो कहा होता उसने
दिल का हाल बयाँ किया होतो उसने
हम इंतजार करते रहे उसके इजहार का
तिरछी नजरों से घायल किया उसने-