Akash Rathod   (Akash Rathod)
9 Followers · 13 Following

read more
Joined 14 October 2020


read more
Joined 14 October 2020
12 FEB 2022 AT 21:07

आज आयुष्यातला पहिला पुष्गुच्छ तिला दिला. व्हॅलेंटाईन विक असून पण भेट नव्हती पण आज भेटलो तिला. ते डेट वगैरे काय कळत नाही पण बाहेर पडलो घेऊन तिला. दोघेपण कुठे आम्ही पिझा बर्गर खानाऱ्यातले, मग पोटभर बिर्याणी आणि मस्त तंदूर वर ताव मारला. तिला तिच्या हॉस्टेल वर परत सोडण्याधी दोन सिप चहा देखील झाला. दारात हॉस्टेल च्या तिच्या, ' बाय' च्या आधी एक "डेअरी मिल्क" मात्र बाहेर आला. आता ती तिथे अन् मी इथे, पण मेसेजसचा सुरू झाला परत तो "सिलसिला".

-


12 FEB 2022 AT 20:51

ताटात आणि आयुष्यात जे वाढून ठेवलंय तेच गिळायचं असतं. कितीही केलं तरी " तू काय केलंस?" हे लेबल माथ्यावर घेऊन फिरायचं असतं. तू कर्ता आहेस, तु मेलास तरी चालेल पण तु मरत मरतच जगायचं असतं.

-


12 FEB 2022 AT 19:29

माहीत आहे की आयुष्यात FULL STOP ला जागा नाही, पण कधी कधी COMMA इतका असह्य होऊन जातो की FULL STOP सुद्धा प्रिय वाटायला लागतो.

-


2 FEB 2022 AT 0:43

सबकुछ आधा अधूरा सा लागे है,
ये दिल कटी पतंग के पीछे भागे है।
तेरे मिलने की आस तो है,
वरना एक कदम हम जिंदगी से भी आगे है।।

-


2 FEB 2022 AT 0:26

या क्षणाला मला तुझ्यासमोर ठेवेल अशी एकही ओळ लिहिता नाही आली मला. बघ ना निःशब्द झालोय मी. आता तूच त्या शेकडो ओळी लिहून खोडलेल्या समजून घे.

नाहीतर लिखाण ही स्तब्ध व्हावा असा पाहशील का मला?

-


23 JAN 2022 AT 18:15

एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेताना ती गोष्ट अपूर्ण राहिल्याने होणाऱ्या परिणामांची जवाबदारी पण घ्यायला लागते. कारण लोकं मनासारखं झालं तर आनंद साजरा करतील नाहीतर नेहमी जबाबदारी घेणाऱ्यालाच दोष देत बसतील.

-


23 JAN 2022 AT 9:56

जब जब उड़ना चाहा उसने,
हर बार तो तुमने रोख लिया !
अब लगाके आदत कैद रहने की,
क्यों भला उड़ने के लिए छोड़ दिया ?

-


17 JAN 2022 AT 0:10

भुकेला तो प्रेमाचा,
प्रत्येक चेहऱ्यात तो प्रेयसी शोधत राहिला !
जेंव्हा भेटली ती मनासारखी,
अगदी ओसंडून तिच्यासाठी वाहत राहिला !!

होतं नव्हतं सगळं पणाला लावत, हातात तिचा हात घेत,
स्वप्नांच्या होडीत घेतली त्याने झेप !
खुशाल जिंदगीची सारी स्वप्न त्याने विणली होती,
होडी आता कुठे एका किनाऱ्यावर त्याने आणली होती !!

काळाचा घात झाला, मनाचा प्रेत झाला
स्वार्थापोटी जवळ आलेल्या तिने, स्वार्थ साधला !
किनाऱ्यावरून होडीला हळूच धक्का देत, पाय तिने किनारपट्टीवरच रोविला,
तिच्याकडे एकदाचं शेवटचं पाहत, एक स्मित हास्य करत, तो माञ वाहत गेला !!

-


13 JAN 2022 AT 17:26

झाकून ठेवावं तितकं दिसतंय,
ए वेडे, आता कळू दे की सर्वांना!
हा असा फोल लपंडाव,
प्रेमाच्याच तर नशीबी असतंय !!

-


13 JAN 2022 AT 2:44

दिसाची रात जाहली, रात्रीची झाली ही पहाट,
उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या तूझ्या स्वप्नांचा काय हा थाट!
मनासारखं वागणं कठीण तरी जगणं माञ सोपं वाटे,
आस लागते जेंव्हा तुझी दिलाला, पाषाण हृदय ही हे दाटे!!

-


Fetching Akash Rathod Quotes