बहरलेला असतो अंगणी,आकांक्षांचा न संपणारा सडा
पण जाण माणसा तू,जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा...!
येईल कधी हा नकळत, सुसाट्याचा वारा,घालील तुझ्यावर न सांगता घाला
विझून जाईल,दीप तेवलेला
अन मग नाही उरणारा राहाडा
जाण माणसा तू,जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा...!
आज आहे तर उद्या संपले,जीवन ऐसेच आहे
तू गेल्याच्यापाठीही जग हे,होते तसेच आहे
प्रत्तेक क्षण इथें जग हर्षाने,होऊन शहाणा अन वेडा
जाण माणसा तू,जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा...!
डोळ्यामध्ये ठेव जिवंत स्वप्नांची ज्योत
जीवनाच्या शेवटच्या क्षणीही दे आनंदाची सर्वांना भेट
डोळे मिट तू हसत हसत,निर्मून आठवणींचा वाडा
जाण माणसा तू,जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा...!- आकांक्षा साळवे
27 JUL 2019 AT 17:50