शेतकऱ्यांच्या मालाले भाव नाही
तरी मनात संपाचा भाव नाही
पेंशन, बोनस, महागाई भत्ता
योजना फक्त नोकरदाराच्याचं असतात
वेळेचे पैसे सेकंदानं मेजतात
वेतनवाढी साठी संपा जुटतात
पगाराच्या सुटीचा मजा लुटतात
सरकारी जावयाचा किताब जिंकतात
सांग कोण होईन शेतकरी
अशी हाय या देशाची दरी
नापीकी, दुष्काळ
तरी ही पिकाले नसते भाव
कर्जाच्या ओझ्यात होतात हाल
हक्कासाठी लढत नाही
शेतकऱ्यांसमोर सरकार झुकत नाही
म्हणून जगाचा पोशिंदा टिकत नाही
अजिंक्य पाटील गावंडे
-
आठवन झाली रमा तुझी आज
जवा पेटवली भिमाची ज्योत
या लेखनीचा कैवारी भिम
ज्ञानाची अमृतवाणी भिम
जनाची बनला ढाल भिम
जवा पेटवली भिमाची ज्योत
आठवन झाली रमा तुझी आज
हरीजनाचा केला हरी
मंदिराची ऊघडली दार
शिक्षणाची देली हाती तलवार
अशी बनला भिमा जनांची धार
आठवण झाली रमा तुझी आज
जवा पेटवली भिमाची ज्योत
गोरगरीबाची हाक भिम
उगवत्या सूर्याची ऊब भिम
अशी पेटती मशाल भिम
मुक्याची आवाज भिम
घेऊन हाती संविधान भिम.
.अजिंक्य पाटिल गावंडे.
-
काय इतिहासाची वाणी
विर योद्धांची काहाणी
राजे महाराज्यांच्या गाथा
अमर जिवंत लढाया
विर शैर्याच्या चढाया
कोणी हजारोला भारी
कोणी लाखोंचा शीरसेंद करी
योद्धे धिप्पाड पाहाळ
जसा नरसिंह अवतर
एका हाती भाला दुसरी
रणांगण गाजवे तलवार
जसा लढते काळ काळावर
वाहे रक्ताच्या नदया
घेऊन युद्धाच्या कथा
असा अमर इतिहास
रक्त पानावर थोरवी गात
-
जात सोडली धर्म मोळला
मायबापचा गुरुर मोळला
बापाच्या काळजावर घाव कोरला
होती दुनिया मायबाप बहीण भाऊ
ही अख्खी तोडली कोठडीत ओढली
तरी म्हणे सुखी राय माय
त्रास झाला तर तुया बाप हाय
तरी पोरी जरा जपुन राय
प्रेम वासनेचा फरक पाय
नाहीच समजलं प्रेम मले
फसवणूकीचा खेळ गळे
वासनेची शिकार झाली
वाटेल तशी छेडल्या गेली
छत्तीस तुकड्यात वाटल्या गेली
बाबु सोना जिती जाळल्या गेली
अशी प्रेमीका मारल्या गेली-
पक्षापक्षा रंगत जमली
कोणी तिरंग्याची
कोणी भगव्याची शपथ घेतली
माया गांधी तुया सावरकर
अशी वाटणी केली
जेनतीची धर्मात छाटणी केली
इतिहाची खोटी रेखाटनी केली
खर खोट सारं झालं
भांडन तुम्ही राजेवर नेलं
उगाच नका पेटवु
तलवारीला धार दाखवु
मस्तकांची होईल छाटणी
तेव्हाच पटेल महाराष्ट्रला खात्री
वाटा तुम्ही समाज नेते
नका पेटवु उगाच टेंबे
-
यश अपयशाच्या काय असते नको सांगू
आम्ही शेतकऱ्यांच्यी पोरं आयुष्यभर लढु,
वादळाशी झुंज मातीचा खेळ मातीशी खेळु
श्वास असेपर्यंत मृत्यूशी झुंजू,
नाही शिकवल कधी बापानं झुकनं
चोरी शिनाली हे वाईट कृत्य,
एक वेळ उपाशी झोपी
तरी बापाची ईमानदारी कायम राखु,
पैसाच्या डावात पैसाच हारला
पैसान आज देवही तारला,
आजचा खेळ ऊद्या होने नाही
काळासोमर काळही तरने नाही.
-
सरकारी योजना
कागदोपत्रीच रमतात
नोकरशाहीला बळी पडतात,
गाव शहर अशी दरी
योजनेचा लाभ दुप्पट भारी
नाही राबत खेडोपाडी,
सरकारचा फेर बदल
कामाला स्थगिती
हेच चालतं देशभरी,
विचार होत नाही जनतेचा
आपसात चालतात हेवे दावे
कुठवर चालणार गनिमी कावे.
-
आभाळात चंद्र तारे
एकमेकांचे आधार झाले,
थोडी परत ढगांची
हरवली चमक सारी,
मित्र , तुझ्यामुळे
वदनेत ही संवेद आहे
सहवास भावापरी
जानतो भेद माझे,
आयुष्याची कसोटीत
निखरत जातो माझ्या परी,
मित्र, तुझ्यामुळे
शुत्रु करतो प्रवासात ही,
-
घे भरारी
आभाळ तुझ
ध्येयाने वेड्या
स्वप्नला भिड़
आशेच्या उन्हात
भरड़ स्वरुप
ऊदयाचा दिस
तुझाच होईल
संयम तुच
यशाचा गुड़.
-
सत्तेसाठी सत्ता उभी
चुकीची जाहीर माफी ,
तथ्य मात्र गुळ राहील
जुन तेच मुळ राहील ,
बंद खोलीत खातर जमा
कशाची भरली जाहीर सभा ,
शेतकऱ्यांचा प्रश्न कुठे गेला
ओला दुष्काळ कुठे नेला,
दिवाळीचा शिंगा आला
खोट्याचा बजार सारा ,
भिकेवर देश आला
70चा कार्यक्रम 8 त केला,
अजिंक्य पाटिल गावंडे.
-