Ajay's Quote Speak   (Unconquerable (ajay))
318 Followers · 573 Following

Feeling of words ✍️
Joined 8 October 2020


Feeling of words ✍️
Joined 8 October 2020
18 JAN 2022 AT 11:27

भटकंती मत करना
ये तुम्हारे भितर है
बाहर नहीं

-


18 JAN 2022 AT 11:26

सहन खूप केले
कष्ट खूप केले
तरीही जगतो आहे
जतन करण गरजेचं आहे

-


18 JAN 2022 AT 11:24

Beautiful but you can not see
Free but you will be busy
Enjoyable but you are bounded
Life but you can not tell it as life

-


18 JAN 2022 AT 11:21

परत एकदा अंधारच वाटला
कारण तुम्हास सांगतो,
आज सकाळी दिसले मला तेच लोक
जे लोक म्हणावयास जीभ नकार देते
ते टोमणे त्यांचे आज खूप असह्य झाले
माणूस माणसाला एवढं परक करतो
भटकलो मी इकडे तिकडे
मला माझीच कीव आली
सांगत बसलो मनाला
बघ, कशी ही सकाळ आली
जिथे आपण एकटे पडतो
तिथे आपणच आपले सोबती होतो
हा जीवनाचा एक अटळ नियम
या नियमापुढे कुणाची चालत नाही
जसा खेळ चालू आहे तसा चालू आहे
जीवन प्रवास चालू आहे
फरक एवढाच आहे
जगण्यासाठी रोज रोज मरावं लागत
Written by
Ajay D. Pazare

-


2 JAN 2022 AT 18:00

कविता :- रियांश
आदित्याचा प्रथम किरण म्हणजे रियांश
प्रदीप-वृषालीचा अंश म्हणजे रियांश
आजी आजोबांचा नवा मित्र म्हणजे रियांश
घरादाराच चैतन्य आणि आनंद म्हणजे रियांश
शाक्यमुनी गौतमासारखे सम्मासंबुद्ध तू व्हावे
आकाशगंगे एवढे विस्तृत यशस्वी तू व्हावे
अत्त दिप भव: आशिषरुपी मंत्राने तू प्रदीप व्हावे
संस्कार,स्वास्थ्य,सुख,ऐश्वर्य,समृध्दीने संपन्न तू व्हावे
भारतरत्न बाबासाहेबांसारखे प्रेरणा तू बनावे
महात्मा ज्योतिबांसारखे कर्तव्यनिष्ठ तू बनावे
शिवाजी महाराजांसारखे निडर तू बनावे
अब्दुल कलामांसारखे आदर्श तू बनावे
आयुष्यमान भव:, आशिष तुला अनंत
हो यशवंत, धनवंत, कीर्तीवंत, गुणवंत
शुभकामना तुला , तू हो ओक्षवंत
जळी स्थळी तू हो महंत
अनंत आशिर्वाद तुला, कामना प्रथम जन्मदिवसाच्या
जीवनी तू हो खूप मोठा, कामना भविष्याच्या
रोशन कर तुझ्या कुळाचे नाव या जगती
आसमंत सदैव असो उल्हासाचा तुझ्या स्वागती
....@जय














-


30 NOV 2021 AT 18:16

कविता:- अनंत

मनसोक्त बोलणारा, सच्चा माणूस तू
बिनधास्त जगणारा, सच्चा माणूस तू
कितीही काही झाले ना, मी आहे ना
एवढं बोलून सांभाळणारा ईश्वरच तू
भाग्यवंत मी आहे, मला माझाच गर्व
लाभला तुझसारखा सखा हेच सर्व
तुझ्या खांद्यावरच्या हातात जी जादू आहे
ती आजवर कुणाला आलीच नाही
कठीण परिस्थतीला सामोरे जाण्याची
आणि लढत राहण्याची प्रेरणा तूच दिली
माझ्या अवती भोवती सहवास तुझा
जशी तू माझी आहेस सावली
सारे जग मायाजाळ आहे म्हणतात
अपवाद तूच आहेस पण त्यात
तू मैत्रीची माया दिली ना म्हणून
तेही मला खोटेच वाटले
आकाशी उडताना मातीची किमया किती
हे वारंवार सांगत प्रेरणा देणारा तू सारथी
स्वप्नांना बळ देणारा तू शुभचिंतक
नावाप्रमाणेच कीर्ती तुझी केली सार्थक
माझेही आयुष्य लाभावे तुला एवढी कामना
मागणे दुसरे नाही काही या जीवना
ज्याला अंत च नाही असा अमर अनंत तू
सर्वांना लाभावा मित्र तुझसारखा ,जसा भगवंत तू
...@जय

-


24 OCT 2021 AT 22:22

When Bakbencher got 100 out 100
Topper will be like..👇👇

-


20 AUG 2021 AT 23:56

कविता :- ऩन्हा मेहमान
मुस्कुराता रहे ये सलोना चेहरा
हसी खुशियो का जिन पर पेहरा
ये हमेशा रहे तुम पे ठेहरा
आशीष का रहे जीवन पे सेहरा
बढो अपने राह पर,चढ़ो मंजिल की चाह् पर
तुम्हे पाना है मुकाम, चलो ना ये डगर
हरियाली से जिंदगी रहे सदा सदा भर
मिले तेरे सारे दुःख मुझको मगर
आखो के तारे, सबके प्यारे
तेरे लिये लाऊ चंदा सितारे
तेरे सारे नखरे लगते न्यारे
पल ऐसे हमारे संग बितारे
तुमको जन्मदिन की बधाई
आज ये शुभघड़ी आई
त्यौहार हे , बांटू मिठाई
जिंदगी ने जिंदगी पाई
*....@jay*

-


25 NOV 2020 AT 23:06

ही कविता आजीसाठी 📃
कविता:-आईची माया
निजत नाही डोळं तीच ईचारांन उद्याच्या
थकून घरी आल्यावर नसे प्यायला एक कप च्या
कुळाच्या घराले दिव्याचा प्रकास
फाटक्या छतातून दिसे चाण्णी,चंदर,आकास
भर पायटी उठणं ,न कामाला लागण
झोपणं बी नाय तीच, रातभऱ्याच जागन
चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अन पिकलेले केस
डोयाखालच्या काया रेघा असा दिसते भेस
पतल्या चप्पलीला काटं रुतलेल,पाय तीच सुजून बसलेलं
तरीबी चालते भरभर न इसावा घेता,शिदोरीला पाणी असे घेतलेलं
सूरयाच तापनं अन भर उन्हात काम, तरीबी न्हाय आराम
दिसभर मोळ्या जमा करण,न डोईवर ओझं आननं पण न्हाय विराम
जाईल इकाले मोळी घेऊन,चार पैक्याच मले खाऊ आणलं
म्या लय थकले अस मले कधीच न्हाय म्हणलं
वरखंडा हाताले ,तरीबी भाकरी थापन आम्हासाठी
कष्ट सोसते एवढे माय ,मिळण्या पोटभर खाण्यासाठी
मायेचा संघर्ष शिकवते, जगण्याचा रोज धडा
बंजार जमिनीतबी फुलविते हिरवागार मळा
आईची माया अशी असते की येते डोयात पाणी
कळते त्यालाच तिचे सुख दुःख , जो आईची माया जानी
.....अजय ✍️☺️💝


-


17 JAN 2022 AT 21:30

अविनाश
प्रिय दादा लाभो अखंड आयुष्य
नांदो सदैव तुला निखळ हास्य
उमलो तुझ्या पाऊली सुमने
वाट तुला फुलांची बने
शोभते जसे मुखी हसू
म्हणून कधी नको रुसू
बहरत राहो वेलं तुझ्या कार्याची
जोड तुला तुझ्या कर्तव्याची
स्वप्न तुझे साकार व्हावें
यश तुला भर भरून मिळावे
जशी तुझ्या हाताला चव
आयुष्य ही असच हव
साऱ्या शुभेच्छा तुला अर्पण
मिळावे तुला नवं चैतन्य
समृद्धी, खुशहाली, आरोग्याने सुरेख असावा तुझा प्रवास
ह्याच भेट म्हणून शुभ इच्छा तुला दादा अविनाश
Written by
Ajay D. Pazare

-


Fetching Ajay's Quote Speak Quotes