Ajay Borkar   (अजय बोरकर)
143 Followers · 251 Following

read more
Joined 16 July 2020


read more
Joined 16 July 2020
22 NOV 2023 AT 7:30

दोन शेर
कर्मानुसार मानव हृदयात जात असतो..
स्वर्गात जात नाही नरकात जात नाही..

शायर मनात मोठे होणार ना कधीही..
त्यांच्या विचार गझला जर मेळ खात नाही..

अजय बोरकर

-


19 NOV 2023 AT 20:08

यार इश्क में ईमानदारी का
सूरज जब डूब जाता है।
फिर जिंदगी से भी इश्क
करने से दिल ऊब जाता है।

-


17 NOV 2023 AT 20:29

पाहून खिन्न दुःखी जगण्यात मी स्वतःला..
जाळून घेतले मग सरणात मी स्वतःला..

झिजवून प्राण अवघे घरदार सजवितो अन्.,
अंतिम क्षणात बघतो कचऱ्यात मी स्वतःला..

भूकंप वा त्सुनामी निर्धोक झेलल्यावर.,
उध्वस्त काल केले प्रेमात मी स्वतःला..

तोंडावरील त्यांची जग धूळ दाखवेना.,
निर्मळ असून बघतो चिखलात मी स्वतःला..

हे सत्य जीवनाचे मेल्यावरी कळाले.,
ठेवू पुन्हा न शकलो गर्भात मी स्वतःला..

अजय बोरकर

-


16 NOV 2023 AT 10:11

#जिंदगी की दलदल

है ये जिंदगी की दलदल।
होता है सच्चों का छल।
ईमानदार लड़े बस अकेला,
बेईमानों के पीछे हैं दल।

अजय बोरकर,
कारंजा लाड़।

-


26 FEB 2023 AT 12:51

यातनेला मी जरी भेटून आलो..
पण मनाशी ना कुण्या खेळून आलो..

दुर किनारा सागरापासून जातो,
मी बनत भरती मिलन घडवून आलो..

अजय बोरकर,काजना राजना,
अमरावती..

-


14 FEB 2023 AT 21:39

चॉकलेट, टेडी, गुलाब यातले काही नको,
राव भेटण्या आज फक्त डोरले घेऊन या!

अजय बोरकर,
अमरावती..

-


12 FEB 2023 AT 9:20

शांतता संयम तिमिर समजून आलो..
कोळशाच्या आत मी राहून आलो..

सोड आता माग माझा काढणे तू.,
यातने मृत्यूस मी जिंकून आलो..

शूद्र ब्राम्हण वैश्य क्षत्रिय कोण आहे.,
होवुनी माणूस पोटातून आलो..

बापजादे मंच ना देवून गेले.,
या दिशेने मी स्वतः चालून आलो..

मी उचलली लेखणी विद्रोह करण्या.,
प्रेमपत्रे कालची जाळून आलो..

अजय बोरकर,काजना राजना,अमरावती..

-


8 FEB 2023 AT 9:56

ये जहां भुलनेवाले थे।
आज हम मिलनेवाले थे।

काट दी टहनी वो जिसपर,
फूल दो खिलनेवाले थे।

क्यों लगाई अब पाबंदी,
आग पर चलनेवाले थे।

अजय बोरकर,अमरावती...

-


24 JAN 2023 AT 22:21

भाई मत बना बहन मत बना..
सब अपने है ये जहन मत बना..

अजय बोरकर,अमरावती..

-


15 JAN 2023 AT 9:16

पाहुनी भाकर तुझ्या आतला कुत्रा,
फेकतो तोंडातली हिसकण्या माझी..

अजय बोरकर,अमरावती..

-


Fetching Ajay Borkar Quotes