Adv Suyog Molane   (ॲड. सुयोग मोलाने (भोसले))
0 Followers · 2 Following

Joined 9 December 2023


Joined 9 December 2023
12 FEB AT 18:40

राजकीय घटणा पाहता त्याचं आश्चर्य वाटत नाहीये, मात्र तोंडाला फेस येईपर्यंत टीका करणारे नेते भाजप नावाच्या पक्षाच्या तसेच ED, CBI यांच्या दबावाखाली धडाधड पक्ष सोडताना दिसत आहेत.!
हस्यास्पद बाब ही की, हे नेते राजीनामा पत्रात खाली "आपला विश्वासू" असा उल्लेख करत आहेत..!!

-


25 JAN AT 16:55

उपोषण, मोर्चा यासाठी परवानग्या नाकारल्या जातील, मार्ग बदलले जातील, त्रास दिला जाईल आणि मराठ्यांवर खोटे गुन्हे देखील दाखल केले जातील...
मात्र मागं हटायच नाही... जिद्दीनं लढायच...,
न्यायालयीन कामात कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास हक्काने संपर्क करा.!
मराठ्यांसाठी व त्यांच्या हक्कांसाठी रात्रीचा दिवस करू...!!
संपर्क:- ७०३९२०६५३६

-


22 JAN AT 15:28

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या प्रकरणाचे सर्वोच्च न्यायालयात यशस्वी प्रतिनिधित्व करणारे के. परसरण यांनी वयाच्या 90 व्या वर्षी न्यायालयात सलग 4.5 तास युक्तिवाद केला आणि विशेष म्हणजे ह्या युक्तिवादाच्या दरम्यान त्यांनी पायात पादत्राणे घालणे देखील टाळले.... यानिमित्ताने त्यांनाही विसरता येणार नाही...!!

-


22 JAN AT 15:09

पृथ्वीच्या हृदयात आज ईश्वराची प्राणप्रतिष्ठापना त्यानिमित्ताने देशात मंदिरांचे जीर्णोद्धार, उत्सव, संगीत, रांगोळ्या, पताका, झेंडे, भजने, मिरवणुका, दीपोत्सव देशासह अयोध्येतील रोषणाई आणि स्फुर्ती ह्या सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहोतच आणि ह्यास वर्षातील दुसरी म्हणजे "राम दीपावली" च महत्त्व...!!

-


10 JAN AT 23:04

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे अवलोकन करता, आता संविधानाचे परिच्छेद १० आणि पक्षांतर बंदी कायदा ह्या दोन्हीही गोष्टीची गरज उरलेली नाही असं म्हणावं लागेल...!
बाकी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मुलांनी उसणं बहुमत गोळा करून जन्म देणाऱ्यांविरूद्ध कितीही आदळाआपट केली तरी "बाप तो बापच...!!"

-


30 DEC 2023 AT 0:51

स्थापना, पूजा याबद्दल विरोध नाहीच...,
मात्र रामायणा नंतर श्री राम जणू आता थेट २२ जानेवारीलाच प्रगट होणार, अशा स्वरूपाची तयारी, नको त्या सजावटी आणि ह्या सर्वांसाठी जनतेच्या खिशातील करोडो रुपयांचा अपव्यव होताना दिसतोय. यापेक्षा शेताच्या बांधावर असणारे भैरोबा, म्हसोबा, रोकडोबा, मरी आई, तुकाई, येमाई, सटवाई ही विना खर्चिक दैवते बळीराजाला कायम बळ देतात... ही तफावत व माणसाची सत्तेपोटी देवाचंही भांडवल करण्याची वृत्ती पाहून वाईट वाटतं...
असो, जयाचा भावार्थ जैसा...!!🙏

-


24 DEC 2023 AT 12:47

भाजी, भाकरी करणारी स्त्री विमानाचं नेतृत्व करु लागली, झाडू असणाऱ्या हातात संगणकाच कमांड आलं, केवळ मुलं नाही तर देशही सांभाळू शकते म्हणतं देशाच्या सर्वोच्च पदी देखील ती विराजमान झाली..!
बाईच्या ह्या प्रगतीचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोतच मात्र एवढं कर्तुत्व मिळवून देखील घरातील पारंपारिक चूल, मुल आणि घरगाडा ह्या गोष्टींना बाईनं कधी बगल दिली नाही... ह्यातच तिचं "स्त्रीत्व" !!

-


23 DEC 2023 AT 2:33

नाताळा निमित्त विदुषकी टोप्या घालुन, पांढरी दाढी लावून, सजवून-धजवून आपण आपल्या लहानग्यांना शाळेत पाठवलं मात्र त्यांना भल्या पहाटे हरिनामाचा गजर करत, कशाचीही अपेक्षा न करता आपल्या गाठोड्यातुन सुख वाटणारा "वासुदेव" नावाचा अवलीया कोण हे सांगायचं मात्र विसरून गेलो..!!

-


Seems Adv Suyog Molane has not written any more Quotes.

Explore More Writers