Aditi Sutar  
56 Followers · 36 Following

Joined 2 July 2018


Joined 2 July 2018
30 AUG 2021 AT 23:31

जर तुम्ही मुळातच सुर्यासारखे असाल,

तर,

कोणी कितीही प्रयत्न केला तरी
तुमच्या तेजाला झाकू नाही शकत.

आणि,

तुमचं तेज इतरांपासून लपूही नाही शकत.

-


13 AUG 2021 AT 10:55

ज्यादा बडे बनके करोगे क्या?

अपने अंदर का बचपना जिंदा रखो,

जिंदगी जिने लगोगे ...

-


4 JAN 2021 AT 16:20

'मला हे जमेल की नाही' असा विचार करण्यापेक्षा,
एकदा ते काम करुनच बघावं....

जर जमलं तर आत्मविश्वास,
आणि नाहीच जमलं तर अनुभव नक्कीच मिळेल....

-


4 OCT 2020 AT 23:42

जे आपलं नाही
ते आपल्याला कधीच मिळणार नाही,
आणि
जे आपलं आहे
ते आपल्याकडुन कधीच जाणार नाही.

फक्त या दोन गोष्टींची जाणीव असली
की आयुष्य खूप सोपं वाटायला लागतं.

-


5 SEP 2020 AT 22:32

चांगले काम कराल तर
प्रत्येक वाईट गोष्टीतून
सहीसलामत बाहेर पडाल...

पण वाईट काम कराल तर
तुमच्यातल्या उरल्या सुरल्या
चांगुलपणालाही कायमचे मुकाल ....

-


20 AUG 2020 AT 18:13

अपेक्षेप्रमाणे सगळं व्हावं असं वाटत असेल,

तर

अपेक्षेपेक्षा जास्त कष्ट करायची तयारी पण असावी.

-


12 AUG 2020 AT 18:39

Those who are ready to fight hard,
Never ever give up...
We call them 'Winners'.

Those who tend to give up easily,
Never ever try to fight...
We call them 'Losers'.

Choose wisely...
Who you want to be???

-


12 MAY 2020 AT 17:55

घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं...

सगळचं तुझ्यासारखं होत नसतं, सगळचं माझ्यासारखं होत नसतं,
म्हणून घडलेलं सगळचं चुकीचं ठरत नसतं...

चुकांचे हिशेब मांडता मांडता आनंदी व्हायचं राहून जातं,
मग बिघडलेल्या गोष्टी सांधता सांधता,आयुष्यातून जगणं मात्र वजा होतं...

उद्याची वाट पाहता पाहता आज जगायचं राहुन जातं,
आणि आयुष्याच्या शेवटी याच चुकांचं मनभर ओझं होतं...

तुझं माझं करता करता आयुष्य असचं निघून जातं,
पण आपलं म्हणून पाहिलं की बरच सगळं सोपं होतं...

तुझं माझं सोडून दे, प्रत्येक गोष्टीला आपलं म्हणून बघ,
आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जग... कारण,

सगळच तुझ्यासारखं होत नसतं, सगळच माझ्यासारखं होत नसतं,
म्हणून घडलेलं सगळचं चुकीचं ठरत नसतं...

-


13 APR 2020 AT 23:10

पप्पा,

आज तुमचं दुसरं पुण्यस्मरण...
बघता बघता दिवस सरत गेले,
पण तुमची सोबत नाही सरली,
तुम्ही आजही आमच्या सोबत आहात,
आणि सदैव सोबतच असाल....

तुम्ही नेहमी म्हणायचे,

मोठी स्वप्ने बघावी, ती पूर्ण करण्यासाठी धडपडावं,
जिद्दीने लढावं, आपल्या स्वप्नांवर कुणी हसलं तरी पुढे चालत राहावं, कारण वेळ सगळ्याची योग्य उत्तरे देते...

सर्व परिस्थिती सारखी नसते, परिस्थितीशी जुळवून घ्यावं,
वेळ पडलीच तर प्रसंगी कठोरही व्हावं...

तोडणं खुप सोपं असतं, पण आपण नेहमी सगळं जोडत राहावं...
अशा तुमच्या एक ना अनेक, किती गोष्टी बोलू?

आयुष्यात पुढे चालताना आज प्रत्येक वळणावर तुमचे विचार आठवतायत,
कदाचित पुढच्या वाटचालीत आमची पावलं अडखळू नयेत, म्हणूनच वेळोवेळी तुम्ही हे बोलत आले असाल आमच्याशी....

खूप नशीबवान आहोत आम्ही....
तुम्ही तुमचे विचार असे रुजवलेत आमच्यात, की
आज तुमचे विचारच आमच्यासाठी तुमचं बापपणाचं कर्तव्य निभावतायत....

-


3 APR 2020 AT 23:08

कधी कधी उगाच वाटतं वारा होऊन स्वैर वाहावं,
तर कधी वाटतं पंख लावून उंच उडावं...

कधी कधी वाटतं पाऊस होऊन बरसावं,
तर कधी वाटतं पावसालाही घट्ट पकडावं...

कधी कधी वाटतं फुलपाखरू होऊन बागडावं,
तर कधी वाटतं हिंदोळा होऊन झुलावं...

कधी कधी वाटतं स्वप्न होऊन सजावं,
तर कधी वाटतं स्वप्नांच्याही पलिकडे जावं...

कधी कधी वाटतं शब्दांच्या राशी रचाव्या,
तर कधी वाटतं अबोल्यातच सगळं असावं...

कधी कधी वाटतं, हे वाटणंही खरं असावं,
नसलेल्या गोष्टी असल्याचं सुख त्यात मिळावं...

-


Fetching Aditi Sutar Quotes