म्हणजे तू हवी होतीस मला हसवण्यासाठी, निष्फळ बाष्फल बडबड करण्यासाठी ..
उनाड उखाळ्या त्या चाफ्या च्या झाडाखालील आठवणी काढून गाल दुखे पर्यंत हसवण्यासाठी ..
अस नसत रे आज्या म्हणून समजवण्यासाठी..
तू नाहीस सोबत हे मान्य करून दुःखाला बोथट करण्याचा सतत निष्फळ प्रयत्न करावा आणि आवंढा गिळताना नेमक कुठे दुखतंय हे कळू नये..मग ते शोधताना जळती सिगरेट बोटांनी चुरघळून बोटांना चटका लावून घ्यावा आणि लाल झालेल्या बोटावर दुखणं सापडलंय म्हणत फुंकर घालताना डोळ्याच्या पापण्याच्या कडा ओल्या व्ह्याव्या.
तुझं नसणं इतकं सोप्पं आहे..
आपण सोबत चाललेल्या रस्त्यावर नजर जावी तेव्हा तू हरवलेल्या खुणा रस्त्याने सांगाव्या..
मग त्याच्या मागच्या वळणावर तू कोणते निरोप ठेवले होतेस विचारावे तर ते कालच्या सावलीलाच ठाऊक होते म्हणत रस्ता गडद हसावा.
चाफ्या तुझ नसणं इतकं सोप्पं आहे..
आणि सर्व इतकचं सोप्पं असेल तर तुला करकचून घट्ट आठवून एखादया ताऱ्याशी बोट दाखवलो तर तू परत भेटशील असे विचारलो ..तर नसण्याचे..श्वास संपण्याचे नियम वेगळे असतात म्हणत नाहीशी होशील..
चाफ्या तुझ नसणं इतकं सोपं आहे.
ऐक ना..
आपल्या असण्या नसण्याचे सर्व नियम तोडून तू हवा होतास रे ..
किंवा मला हे सर्व नाहीच आवडलेय म्हणून किमान रागवण्यासाठी तरी..
प्रिय मित्रा
@Abhijit p-
Abhi patil
(Abhijit patil)
84 Followers · 46 Following
Joined 3 July 2019
25 MAY AT 1:58
25 MAR AT 15:16
त्याने तो चाफा तिच्या कानामागे ठेवला
आणि त्याच्या ओंजळीतला मोगरा ईर्षेने खाली पडला..
-
15 OCT 2019 AT 0:01
तूझ्या विना जगेल का मी ...?
नकोच हा प्रश्न कदाचित ..
तूझ्या त्या आठवणी पूसेलही मी कदाचित.! !-