वेल्हाळ मनाला माझ्या लागला
सख्या वेध तुझ्या भेटीचा
गर्दीत या शोधते नजर माझी
जेव्हा चेहरा दिसेल ओळखीचा...
तेव्हा मात्र मला तू अडवू नकोस
हक्क आहे तुला मन भरून पाहण्याचा
स्पर्श करून मी पाहील तुला एकदा
तेव्हा लाव्हा शांत होईल तुझ्या माझ्या विरहाचा...
अश्रू माझे तेव्हा घेतील भरतीचे रूप
पण तुझ्या मिठीत मात्र त्याला ओहोटी येईल
स्वच्छ होईल निरभ्र आकाश तेव्हा
जेव्हा तुझी माझी एक भेट होईल...
-
दो पल मिलते हैं,साथ साथ चलते हैं
जब मोड आए तो बचके निकलते ह... read more
रमणारे शब्द माझे हल्ली एकांत मागतात
माहित नाही का ते फक्त वेड्यासारखे झुरतात...
स्वतःला व्यक्त करताना आक्रोश मात्र करतात
कधी कधी निशब्द होऊन उगाच अस्ताव्यस्त फिरतात..
पांढऱ्या कागदावर ही कधी कधी सुकलेले अश्रू दिसतात
पुसायला कोणीच नसतं म्हणून ते एकटेच ओघळतात..
रात्रीच्या प्रहरी मात्र शब्द माझे शांत सागरासम होतात
आठवून तुला सख्या पुन्हा ते कवितेची वाट धरतात..
लिहित जाते लेखणी माझी आणि शब्द मात्र गुंततात
न सुटणार कोड मन माझं पण तुला आठवताच प्रश्न माझे सुटतात..-
खास असा कुठलाच दिवस नसतो मैत्रीचा
रोज साजरा केला जातो सोहळा त्या अनमोल नात्याचा...-
गुंतली नजर तुझ्यात शिडकाव जणू सुखाचा
चढू लागली धुंद रात्र , होऊ दे वर्षाव प्रेमाचा...
फक्त अधरांची भाषा आणि स्पर्श होऊदे मौनाचा
रात्रीच्या या समयी सखे रंगुदे खेळ प्रणयाचा..
रातराणीचा सुगंध येतो मजला तुझ्या या कोमल देहाचा
केसांचा अडसर दूर करुदे मुखडा पाहुदे माझ्या चंद्राचा..-
व्यक्त करताना मनातलं, शब्दांवर जोर नको
हक्काने सांग तू , पण बळजुबरीचा भार नको...
-
चांदण्याचा शिडकाव हल्ली थोडा कमीच झालायं
निळ्या नभी हल्ली रितेपणा आलायं....-
काळजावर पुन्हा घाव पडला होता
असा काय तुझ्याशी संवाद घडला होता...
क्षणांत स्वप्नांचा महाल मोडला होता
जिव्हारी लागेल असा तू विषय छेडला होता...
श्वासांनी श्वासांचा आधार सोडला होता
मूक अश्रूंनी मात्र न बोलताच टाहो फोडला होता...-
चाळून पाहील मी कित्येकदा माझ्या शब्दांना
पण तुझ्याशिवाय कोणाचं अस्तित्वच नव्हतं त्यात...-
किती दाखले आणि किती पुरावे रोज मी तुला देऊ
कित्येक वार आणि कित्येक जखमा मी रोज काळजावर घेऊ....-
माझ्या मुजोर बटानां सावरतोस तू जेव्हा
खट्याळ हसू गाली खेळवतोस तू तेव्हा...
नजरेत नजर माझ्या बांधतो तू जेव्हा
ओठांची थरथर लाजेने होते माझ्या तेव्हा...
थंडगार स्पर्श तुझा गोठवतो जाणिवा जेव्हा
अंगावर शहारा माझ्या फुलून येतो तेव्हा....
अलगद मानेवर ओठ टेकतात तुझे जेव्हा
श्वास माझे खोल खोल जातात तेव्हा...
प्रेमाची भावनां समजली सख्या मला जेव्हा
तुझ्या प्रेमाची परिभाषा उमगली होती मला तेव्हा...
-