विध्वंस करणाऱ्या शक्तींना शांततेची कधीच गरज नसते.
त्यांना हवी असते, फक्त एक अंधारमय जगाची अवाढव्य जागा आणि त्यावर करावं लागणारं राज्य!
मग ते त्यात एकटे का असेनात..-
जोपर्यंत तुमच्या मनाची शांतता
कुणी हिरावून घेत नाही,
तोपर्यंत तुम्ही अजेय आहात.-
पहिला नसलेला पाऊस..
कुठून तरी आलास, क्षणात गारवा देऊन गेलास
चार सरी अंगावर टाकून, तू पुन्हा निघून गेलास..
वैशाखाचे चटके असे सुपीक तेवढे,
जरा बरसून मग मात्र
आमचे मन नापीक करून गेलास..
सांग, गारवा हा सोसाट्याचा
आता सहन रे कसे करू?
पहिलाच अनुभव असा, तू वाईट देऊन गेलास..-
आयुष्यात एकटं जगताना
तुला झालेला संघर्ष..
काफिय!
अंधारातून वाट काढताना
अचानक तुला
भेटलेला प्रकाश..
काफिय!!
स्वछंद बागेत फिरण्यासाठी
पाखराने कोषातून
घेतलेला एक श्वास..
काफिय!
आपल्या पिल्लांचं पोट भरता यावं
म्हणून आकाशातून
पक्षाने घेतलेला ध्यास..
काफिय!!
माणूसपण संपतं जेव्हा
माणूस म्हणून तू
कुठेतरी हरवतो,
मग त्या माणसाला
पुन्हा माणसांत आणण्यासाठी
जी दाखवतोस तू 'माणुसकी'!
ती एक माणुसकी..
काफिय!!-
अशी एक कविता वाचताना
'त्या' कवितेची का आठवण व्हावी?
आसवांनी शब्द मांडताना
कवीनं नयनांना का सजा द्यावी??
हो.. मीही होतो कवी, एकेकाळी तिचा
रक्तांनी भरून शायरी लिहायचो..
तिला स्मरावे म्हणून, आणि तिने पाहावे म्हणून!
पण आज नाही ते दिवस.. नाही त्या आठवणी..
मग या कवितेसाठी 'त्या' कवितेला आंदण का द्यावी?
शेवटी कविता ही कविताच असते हो..
प्रेमातली की विरहातली?
कवीच्या वाटांना मग कवितेनेच वाट द्यावी..
आजन्म ऋणी राहताना या कवितेला
कवीस पुन्हा 'त्या' कवितेची ओढ नाही का लागावी?-
इथे प्रत्येकजण आपल्या आयुष्याचा नायक/नायिका आहे. ज्याला आपल्या आयुष्यात जिंकण्याचा पूर्ण हक्क आहे. आता जिंकणं वा हरणं हे सारं नियतीच्या हाती आहे. तेव्हा, प्रत्येकजण या स्पर्धेत फक्त सहभागी आहे, कोणीही गाढव/घोडा नाही.
-
मोठ्यांमध्ये लहानांनी आपलं लहानपण दाखवणे हीच तर 'लहानपणाची' खरी गंमत असते.
-
कधी कधी कळतनकळत आपल्याच नातलगांसमोर आपल्याच पाल्याचे खच्चीकरण करून,
वर स्वतःच स्वतःला धन्य मानणारी ही आमची मागची पिढी त्यांच्याच पाल्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरत आहोत, हे का कोणी बरं त्यांना सांगत नाही..??-
आमची मुलं ठार वाया गेली अशी म्हणणारी पालक मंडळी आपल्याच पालकत्वासाठी 'कृतघ्न' ठरतात आणि हे आपल्या समाजासाठी आणि संस्कृतीसाठी विघातक आहे.
-
शेवटी काय राहणार..?
या एकाच प्रश्नाने मला छळलं आहे,
जुन्या आठवणीस उजाळा देत
माझं अख्खं आयुष्य इथे जळलं आहे..-