Aaditi   (आदिती देवघरे)
97 Followers · 25 Following

Joined 23 July 2020


Joined 23 July 2020
26 NOV 2023 AT 20:30

-


26 NOV 2023 AT 20:09

-


31 DEC 2022 AT 23:33

प्रिय डिसेंबर
काहीच क्षण उरलेत तुझ्यासोबतचे
नेहमीच असा लगबगीने येतो
आणी घाईतच निघून जाते,
उरतात मागे फकत आठवणी
आणि असंख्य शिकवणी
कधी कधी वाटतं तू जाऊच नये
अन् मनाला तुझ्याशीच हरपावे..!

प्रिय डिसेंबर सरते शेवटी
काहीतरी विचारायचे आहे तुला ,
असा कसा रे शेवट तुझा
विरह आणि भेटीचे सृजन ज्यात,
इतका कसा रे तू कणखर
नेहमी उत्साही आणि प्रसंगी हट्टी पण
स्वतः मात्र विरहाच्या डोहात
बुडत चाललेला असला तरी
दुसऱ्यांना पोहचवतोच मात्र पैलतीरी..!

-


9 OCT 2022 AT 15:03

.

-


16 JUL 2022 AT 22:22

सांज घराला आली
कानाशी हळुच कुजबुजली,
शोधु पाहतोय उंबरठा
तुझी सावली ,
कधी येशील तु परतुनी ;
अशी कशी ग
तू इतकी दूर गेली..?
जगात आपल्या इतकी रमली...

-


29 JUN 2022 AT 23:38

नादान जिंदगानी
ख़ुद सवाल बन गईं,
कलम के स्याही सी
कागज़ पे सवर गईं।
बवंडर सपनों का
तू ही रख प्रभू
मैं रहना चाहु जुगनू,
तो कभी समंदर सी गहरी..।।

-


17 JUN 2022 AT 21:50

ही रात्र नं अशीच आहे,
अगदी अवखळ, निरागस,
मधुर, सर्वांना आश्चर्यात पाडणारी.!
आणि सर्वांत मोठी कमाल म्हणजे,
...,त्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला
स्वतः मध्ये सामावुन
चांदणी सारखं चमकवते..!!

-


30 MAY 2022 AT 22:45

आई बाबांशी लहान सहान
तक्रारी करता करता,
"अगं आई कशाला गं, नको ना;
सद्ध्या गरज नाहीय गं,
आणि, बाबा तुम्ही कशाला
काळजी करता उगीचच...?
करते मी manage.."
इथपर्यंतचा प्रवास कसा निघून गेला
कळलच नाही...!!

-


22 MAY 2022 AT 22:48

विशाल नभी,
आज निरव रात्र अशी
शीत चंद्र चतकोर...,
संग त्याची चांदणी
चमके आज गगनी;

पाहुनी तयासी वाटे मज
हुंदडाव्या चारी दिशा
गाठावं पैलतीर,
अनं निरखत निरखत तयासी
एका स्वप्नात रमावं..!

-


22 APR 2022 AT 22:52

पडता पडता,
एक आठवण करुन गेला
पुसट झालेल्या क्षणांत
पुन्हा रंग भरून गेला...
कानाशी येऊन हळूच बोलला,
"चढताना पायऱ्या यशाच्या
थोडं दूर गेले स्वतच्या!
खूप काही होतं करायचं,
पण,
राहून गेलं थोडसं जगायचं..!"
असं नको हं व्हायला...

-


Fetching Aaditi Quotes