27 JUL 2018 AT 9:01

गुरु माझा आई, गुरु माझा बाप।
धर्म सेवा तयांची, जणू ईश्वर सेवाचं।

गुरु माझा तुका, गुरु माझा ज्ञाना।
अंभगाची वाणी, ज्ञान देई जना।

गुरु माझा स्वामी, गुरु माझा गजानन।
हेची दत्ताचं भजन, योगीराज सदानन।

गुरु माझा साईनाथ, गुरु माझा ताजुद्दीन।
ठायीं ठायीं चराचर, मालीक सबका एकन।

गुरु नसे धर्मग्रंथात , ना वेद पुराणात।
गुरु नसे कागदात, गुरु आहे माणसात।

अपार गुरुची माया, आसरा गुरुची छाया।
गुरु मारूतीचा मान, गुरु मर्यादेची काया।

एकलव्याचा अंगठा, द्रोणाचार्यांचं मागणं,
कैकई ची ती चिंता, गुरु दशरथाचं मन।

गुरु विद्देचा देवता, गुरु जीवनाचा आधार।
गुरुजी जीवनात शिस्त, गुरुंचे मानावे आभार।

शरीर गुरु नव्हें, गुरु विद्या हीच 'राही'।
विद्या अजरामर, तन अनंतात जाई।

- ©Akshay Charde "राही"