🅜🅐🅨🅤🅡🅘   (मयुरी उबाळे)
837 Followers · 38 Following

read more
Joined 19 June 2018


read more
Joined 19 June 2018
YESTERDAY AT 10:32

ज्या व्यक्तिवर आपण जीवापाड प्रेम केलेलं असतं तो व्यक्ती आयुष्यभरासाठी आपल्या सोबत असेल ही शाश्वती मिळाल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेलं हास्य जीवनातील सगळ्यात सुंदर आणि अप्रतिम हास्य असतं.

-सगळं काही ठीक आहे असं वाटणं आणि खरोखर सगळं ठीक असणं यात खूप फरक आहे.

-जो वेंधळेपणा होता तो चांगला होता.. कधी कधी वाटतंआपल्याला लिहायला येतं ही गोष्ट देखील माहित नव्हती व्हायला पाहिजे. कारण यासोबत आणखीन एक दुःख जोडलं गेलंय आयुष्यात.. सुचलं तर असं वाटतं हे का सुचलं आणि नाही सुचलं तर वाटतं सुचत का नाहीये आजकाल चांगलं काही.. नुसता मनात गोंधळ.. यामुळे ना नीट शब्दांची मांडणी होते ना आयुष्याची फरफट थांबते.. मनावर रोज असंख्य विचार कोरले जातात पुसले जातात. पण सारच काही लिहावं वाटतं नाही आजकाल. लिहिलं तरी काय आणि नाही लिहिलं तरी काय आयुष्य जैसे थे...
रोज तारुण्यात वृद्धत्व घेऊन जगणारे मरणाला रोज विनवणी करत आला दिवस लोटणारे दिसतात, भेटतात. मग वाटतं आपणही यातलेच एक होऊ का कधी???..... का आत्ता आपण आहोत यांच्यासारखे.. की आणखीन वेगळं काही चालूय आपल्या आयुष्यात.. माणूस जवळची माणसं दुरावल्याने दुःखी होतो मान्य, पण सर्वात जास्त दुःख त्याला स्वतःच्या जीवनाची नेमकी व्याख्या काय? हे न समजून आल्याने होतं.माझ्याच बाबतीत का हे असं म्हणुन रोज देवाला कोसून जे आयुष्य वाट्याला आलंय ते लोटायचं असं कुठवर चालायचं या सगळ्या माग काय कारण असेल.. शोध घ्यायला हवाय..

-कितने दिन बीत गये तुम्हारे जाने के
बाद, मैं अकेला कभी सोया नही,
वो साथ होती है तो आँख तो खुलती है
लेकिन वो बिस्तर छोडने नही देती
वो हर वक्त मेरे साथ रेहती है..
नींद से उठने के बाद तो मुझे छोडती ही नही वो..
शायद वो मेरे गहन प्यार मैं डुब रही है,
उसे तुम बोलोगी क्या इतना प्यार भी लाजमी नही..
हात मैं कुछ आता नही.. फिर भी वो तुम्हारी एक ना सुनेगी..
'बैचैनी' है वो एक बार प्यार कर बैठी तो मरते दम तक
सच्चे प्रेमी की तरह साथ निभायेगी..

-माझं आयुष्य म्हणजे,
भेटुनही न भेटल्यासारखं,
असूनही नसल्यासारखं,
मिळुनही न मिळल्यासारखं..
जगूनही न जगण्यासारखं..

-उसवलेल्या अस्तित्वाचा रोज डाव चालतो आहे,
माझ्यातील मला भेटुनही हिशोब चुकतो आहे...
कळेना निखळले काय देह तर सहीसलामत आहे..
प्रश्नांचा भाडीमार रोज जीवनावर तेही निरुत्तर आहे..— % &

-जेवढा मोठा त्याग तेवढं मोठं यश,
जेवढं मोठं दुःख तेवढं विशेष आयुष्य..— % &

-भेटतात बोलतात हसतात सोबतीने,
हेच का ते प्रेमाचे पहिले वहिले पाऊल असते..

रुसतात भांडतात रडतात एकमेकांच्या मिठीत,
हेच का ते येणाऱ्या दुःखाचे सावट दोघांवर असते..

फसतात रागवतात मिटवतात एकमेकांच्या समंतीने,
हेच का ते प्रेम निभावन्याच्या सूत्रांत बांधने असते..

झुकतात मनवतात भेटतात एकमेकांना आठवणीने,
हेच का अपूर्ण राहणाऱ्या खऱ्या प्रेमाला जवळ करणे असते.

-भूतकाळात रचलेल्या रचना साध्यासोप्या,
तुझ्या माझ्या प्रेमाचे सारांश त्यात आहेत..
उगाच का छळावे मनाला वाचून त्यांना पुन्हा,
माझ्यातील प्रेमाचे तेच खरे साक्षीदार आहेत..

जगण्याचे अर्थ झालेत माझ्या आता निराळे,
जे लिहिले होते ते शब्दही इथले पुसले आहेत.
मनात सलते आता गोष्ट दररोज जुणी एखादी,
कळेनाच मला माझ्या आयुष्याला शाप कुणाचे लागले आहेत?

-


5 SEP 2021 AT 20:36

तु बोललास जसे आयुष्या,तसे बडबडले तुझ्याप्रमाणे,
कधी रडले तुझ्याप्रमाणे, तर कधी हसले मनाप्रमाणे....
तु ओळखले खरे मला आयुष्या म्हणुन स्वीकारले तुला तुझ्याप्रमाणे..
कधी वागले तुझ्याप्रमाणे, तर कधी सोडले मनाप्रमाणे...

तु हसलास माझ्यावर आयुष्या,तसे सावरले तुझ्याप्रमाणे,
कधी जगले तुझ्याप्रमाणे, तर कधी विस्कटले मनाप्रमाणे....
तु रडवले खूप मला आयुष्या म्हणुन निर्ढावले अशीच तुझ्याप्रमाणे..
कधी वागले तुझ्याप्रमाणे, तर कधी रडले मनाप्रमाणे...

तु चोरलेस मला आयुष्या, तशी लपले तुझ्याप्रमाणे,
कधी भिडले तुझ्याप्रमाणे, तर कधी निजले मनाप्रमाणे....
तु जाम भारी आहेस आयुष्या, म्हणुन तुला शोधले तुझ्याप्रमाणे..
कधी जिंकले तुझ्याप्रमाणे, तर कधी हारले मनाप्रमाणे....

तु उदार झालास माझ्यावर आयुष्या,तसे हुंदडले तुझ्याप्रमाणे,
कधी उरले तुझ्याप्रमाणे, तर कधी संपले मनाप्रमाणे....
तु सुखावलेस खरे मला आयुष्या,म्हणूनच भरकटले तुझ्याप्रमाणे..
कधी हुसकवले तुझ्याप्रमाणे, तर कधी कुरवाळले मनाप्रमाणे....

-


Fetching 🅜🅐🅨🅤🅡🅘 Quotes