तुझ्या प्रेमाच्या जगात रमलेली मी इथे आहे
शोधू नकोस कुठेही थांबलेली मी इथे आहे
तुझ्या आठवणींच्या अवकाळी पावसात
चिंब भिजलेली मी इथे आहे
प्रेमाची उब देणाऱ्या तुझ्या हृदयात
प्रेम स्पर्शाने वसलेली मी इथे आहे.
माझ्या डोळ्यात साठवून विरहाचा पूर सारा
प्रेम नदी बनून वाहलेली मी इथे आहे.
तुझ्या प्रेमाच्या कोऱ्या कागदावर निळ्यागर्द शाईने
कवितेतील अलंकाराने सजलेली मी इथे आहे.
- सुमीत्रा G इबितदार