गंध गंध प्रेमाच्या पुष्पात
दरवळत नात तुझं माझं
मुक्त मुक्त आभाळ जस
स्वच्छंद मैत्र तुझं माझ

प्रिय प्रिय सहवास तुझा
हवाहवासा स्वर्ग सुखाचा
प्रेम प्रेम वाढते रोज अन्
सोहळा होतो जीवनाचा

मधुर मधुर प्रीत ही तुझी
सुखाच्या जणू पाऊसधारा
विरले विरले तुझ्यात अशी
जशी भेटते नदी प्रेमसागरा

गोड गोड आठवणी अशा
आठवणीने व्याकुळ होतील
दूर दूर अंतर असले जरी
मनाने नित्य बोलक्या होतील

ओढ ओढ भेटीची आपल्या
अन् साक्ष असतील चंद्र तारे
मिठीत तुझ्या जग भासे माझे
आज झाले हे हळवे क्षण सारे

सावली सावली तुझी मी सख्या
आरसा तू माझ्या प्रतिबिंबाचा
भाग्य भाग्य लाभले पत्नी होऊन
प्रेमबंध जुळला साताजन्माचा.

- सुमीत्रा G इबितदार