कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर
जसा प्रगटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा
परब्रम्ह हे भक्तासाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणू कि पुंडलिकाचा
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदरचा हा परमात्मा
वाली दामाजीचा
- ग.दि.माडगूळकर- YQ TAAI
20 JUN 2019 AT 23:42