3 SEP 2019 AT 2:59


गजानना, श्री गणराया,
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती, श्री गणराया,
आधी वंदू तुज मोरया

सिंदुरचर्चित धवळे अंग,
चंदन उटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग,
जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया

गौरीतनया भालचंद्रा,
देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा,
अवघी विघ्ने नेसी विलया
आधी वंदू तुज मोरया 

-शांता शेळके

- YQ TAAI