बटाटा वडा
तेलात तळा
हातात धरा
तोंडात भरा-
सखे पाच वडापाव खाऊन
आता बिघडलय माझं पोट
पैशेही संपले म्हणून,
गोळी घ्यायला दे आता दहाची नोट...
😂😂😂😂😂😂😂-
Today is International
Vada Pav Day..
Have a Bite...
कुठलेही असू दे तुमचे गाव
या खावा वडा पाव-
सखे त्या वडापावातील
बटाटे खूपच होते ग कच्चे
मी तर स्वप्न ही पाहिलं होतं
की असतील भविष्यात आपले दोन जुळे बच्चे
😂🤣😂🤣😂🤣😂🤣-
चार वड़ापाव खा गई और
फिर भी भाव खा रही है
अरे पगली अब इतना भी नखरे मत दिखा
वडापाव से ज्यादा तुम गरम लगती हो
😁😁-
तू तर बटाटा वडा मी बेकरीतला फ्रेश पाव
त्यात आहे प्रेमाची चटणी वडापाव आपले नाव-
लिहायला घेतलं पण
काही सुचत नाही यावर...
लिहायचं राहू दे बाजूला
फक्त ताव मारायचा त्यावर...
तोंडाला पाणी सुटलंय आता
हिच आहे खरी याची पॉवर...
एकानं पोट भरणार नाही
जिभेवर चमचमीत चवीचा वावर...-
पावसाळा आला
की वडापाव हवा
सोबत लाल चटणी आणि
मिरचीचा ठेचा हवा...
पाव एकदम फ्रेश आणि मऊ हवा
चवीला मात्र वडा स्वादिष्ट हवा
गरमा गरम आणि झणझणीत
असा तो वडापाव आणि
सोबत मात्र थोडासा पाऊस हवा ....😄😄-
मऊ लुसलुशीत तुझे अंग
गोडी वाढवी तो पाव तुझ्या संग
आपल्या अंगी मिरवतो चटणी आंबट गोड
वडा - पाव च्या मैत्रीला नाही जगात तोड
दाह विरावा म्हणून पाव वड्याला मिठी मारतो
चटणीने अंग झोंबल तरी अलगद सामावून घेतो
तळलेली मिरची ही मग हळूच मध्ये येते
झणझणीत जरी असली तरी रसनेला तृप्त करते
सुख - दुःखाचे चटके दोघे मिळून झेलतात
एकेमकाशिवाय ते अपुरेच भासतात
चव जिभेची वाढवून ,भूक शमवतात
मैत्री असावी तर अशी, हा धडा शिकवतात
-