#ashtanayikaseries
अभिसारिका (One going to meet her lover)
ती अभिसारिका राधे निघाली रात्री, कृष्णाला भेटायला.
मन अधीर झाले होते, आपले पैंजण बाजूला काढून ठेवले. हातातल्या बांगड्या पण नको, ते खूप आवाज करतात. स्वतःला काळी कंचुकी आणि काळा शालू ओढून घेतला. माथ्यावरचे घामाचे टिपके आपल्या थरथरे हाताने पुसून घेतले...
त्या चैत्र शुक्ल पक्षाचा चंद्राला सांगते, "हे चंद्रा माझी वाट उजळू नको, कारण मला अंधार हवे आहे. हे वसंताचा थंड शितल मरुत् वारा, तू ये आणि सगळ्यांचे नजरेचे दिवे विजवून टाक. मला भीती वाटते की कोणी मला बघेल. हे भयानक सरपा, मला त्रास देऊ नको. तू तुझ्या वाटेवर जा आणि मी माझ्या सावळा कडे..." पण तिला माहीत नव्हते की तिचे कानाचे झुमके निसटून खाली पडले होते...
आज दिसले मला... प्रेमाचा बहावा...
- अमित-
17 OCT 2022 AT 12:36