माय माऊली विठ्ठल माझी,
सोबती रखुमाई...।।
पंढरपुरी वसली अवघी,
माझी विठाई...
हो अवघी माझी विठाई...।।धृ.।।
वारकऱ्याच्या वारीमध्ये,
वाजे टाळ-मृदंग...।।
वारकरी तो माझा गाई,
नामाचा अभंग...
हो हरि नामाचा अभंग...।।१।।
तुझिया चरणी ठेऊनी माथा,
घेतो आशीर्वाद...।।
आज तुझ्या ह्या भक्ता दे तू,
उत्स्फूर्त प्रतिसाद...
हो उत्स्फूर्त प्रतिसाद...।।२।।-
सच्ची कृष्णसंगिनी है रखुमाई।
कृष्णरुक्मीनी से हो गये विठ्ठल रखुमाई।।
भक्तोके लिये खडी मेरी विठाई..।
धन्य धन्य मेरी रखुमाई।।
-
रखुमाई होन सोप नसतं
कृष्णाच्या मनात राधा आहे
माहीत असून ही जीव पाड
प्रेम करून त्याच्यावर जीव
ओवाळून टाकणं सोप नसतं....-
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना ये ग.. ये ग.. रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी
तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास तरी युगे-युगे उपेक्षाच केली तुझी बाई तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर आता करू दे जागर होऊ दे ग उतराई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई…-
अखेर दुरावा दूर झाला...
मला माझा पांडुरंग दिसला...
कानाकोपऱ्यातून लहान थोर
फक्त तुझ्या दर्शनासाठी आला...
वेशीवर वैष्णवांचा मेळा जमला...
गाभारा कसा वारकऱ्यांनी फुलला...
चंद्रभागा तट भक्तीनं न्हायला...
मंदिराचा कळसही डोलू लागला...
भक्तांचा परतून आलेला महापूर
रखुमाईनं भरल्या डोळ्यांनी पाहिला...
इतकी वर्ष विठू तू कसा विटेवर उभारीला...
आज मात्र एकमेव हा असा प्रश्न मला पडला...
संकटातही विठुराया ना डगमगला...
आज्ञा म्हणून ठामपणे उभा राहिला...
वेळोवेळी भक्तांना खंबीर आधार देत
तोच पाठ त्यानं संपूर्ण जगाला शिकवला...
तुझं लेकरू आलं माऊली तुझे आभार मानायला...
अन आज त्याचा सर्वात मोठा सोहळा पार पडला...-
वारी झाली पुर्ण
मिळे सर्वां शांती....
पुण्य कर्म झाले
मनाला मिले विश्रांती...
विठू माझी माय माउली
असे तिची कृपा सावली....
हरिनामाच्या गजरात
दुमदुमली पंढरी....
भीमा तीर निघाले नाहून
भक्तांच्या सहवासात....
विठ्ठलाच्या भेटीने
झालो मी धन्य धन्य....-
युगे आठ्ठावीस उभा
माझा देव विटेवरी....
हात कडेवरी
नजर असे भक्तांवरी....
महिमा त्याच्या अगाज
आहे ...
ओढ मनाला त्याच्या
भेटीची राही....
उभा आहे तो मंदिरी
रखुमाई पाठीशी....
भार सांभाळतो जगाचा
रखुमाई आहे सावली....
-
सखे ह्या सावळ्या विठ्ठलाची
रखुमाई होशील का ...
घेऊनी हातात हात
साथ जन्माची देशील का...
पाठीशी उभी राहावी तू
बनून सावली युगे अठ्ठावीस....
अनंत जन्माची पुण्याई लाभुदे
ह्या जन्मात....
-
वैष्णवांची मांदियाळी निघाली माऊलींची पालखी
मुखी नाम श्रीहरीचे , हातात ध्वज पताका धरी....-