आदित्य लोकरे   (आditya)
34 Followers 0 Following

poet, wildlife photographer.. Traveller, Nature lover.




complicated... 😉..
Joined 2 July 2018


poet, wildlife photographer.. Traveller, Nature lover.




complicated... 😉..
Joined 2 July 2018

रात्रीचे 2 वाजतात
पाऊस.. टिपेला पोहोचलेला असतो. रातकिडे तारस्वरात ओरडत असतात.
संपूर्ण जंगल जागे असते. भयाण रानवाटा वेलींनी वेढलेल्या असतात.
आत खोल जंगलात.... जायला एक किरकोळ तरूणी.. हातात कॅमेरा घेऊन निघते.
बेडर.. बिनधास्त.
हजारो पॅकेज देणारे मार्ग असताना तीने दाट जंगलातील कोयना कुंभार्लीची वाट पकडलेली असते.
सातवीला साप चालला म्हणून ती... सापावर डुख न ठेवता सर्पमित्र बनते.
आणि सुरू होतो एक बेडर प्रवास.... सोबत असतो तिचा मित्र..
प्रवास काटेरी.. भयाण.. श्वापदांनी भरलेला..
पण तीही जिद्दीची...
जंगलाला लागलेली आग विझवणे ते.. विषारी साप पकडून जंगलात सोडणे.. ही कामे लीलया करत...
ती... जंगलातील जंगलमॅन ची घरे.. धनगर पाडे.. कातकरी पाडे यात राहु लागते... त्यांना आपलेसे करते...
आणी शिकता शिकता... बेडूक या विषयावर पीएचडी करणार या निर्धाराला पोहचते....
हातात.. कॅमेरा... बेडकांच्या हजारो जाती.. काही जाती फक्त हिला दिसलेल्या..
नोंदी होत रहातात... आणि पृथ्वीवरील सर्वात अ‍ॅडव्हान्स रहीवासी... बेडुक.. तिच्या पिएचडी साठी पोझेस देऊ शकतात.
ही बेडर तरूणी आहे राणी परभुलकर..
तीने स्वतःहुन स्वतःला नाव घेतले आहे...
"अरणी"... अरण्याची राणी.
हिची संपूर्ण चित्तथरारक कहाणी....

-



भेट व्हावी कधी आपली
शक्यता सांग न कुठे ठिबकली..?
स्वप्नांच्या बांधून माड्या क्षणात
अनावर सैरभैर कुठे ही पळाली.?
कौतुक नको,नको हा नफा-तोटा
भावनेच्या ओढीने मी हा रेंगाळलो
स्पर्श सारा असमांती पसरला
पापणीच्या आत केव्हाच मी भाळलो
उगाच त्या वाटेवरती पाऊले माझी पडली
जिथे ती मी तुझ्यासाठी जाणीवपूर्व मी टाळली.......

-



मोह होता सहज मनाला
दोष मग कोणा द्यावा
सुकल्या काही फुलांचा
बाजार कुणी पहावा
मन व्यापले निर्मोही
वेडे भाव ते सारे
गुंतले धागे मोहाचे
बहर अबोल क्षणांचे
भावनेचा खेळ सारा
नकळत मन मोहून जाता
गहिवरले भाव अलगद
हळवे चांदणे मूक आता
मायेचा खेळ हा सारा
जीवन न कळते कधी केव्हा
मिटल्या पाकळ्या सुकून गेल्या
कोणी त्या न आल्हाद फुंकरिल्या
कळले नाही मन बावरे
शब्दांचा छल तो झाला
तुटले मन नकळत शब्दांनी
अस्तित्व पुसून टाक जरा
व्यवहारी दुनियेत या
मायेचा खोटा बाजार खुला
नकळत मिटले नयन ते
भाव मनात रडवून जातो.

-



सोप्प होतं तिच्या साठी मटकनं लटकनं
गळ्यात हात टाकून सुद्धा धाडकन झटकनं
मला कधी कोणासाठी दगड नाही होता आलं
कोवळ्या कळीला मिठीमध्ये चुरगळता नाही आलं
हाच माझा कदाचित दोष होता भारी
बाय बाय सांगून निघूनही गेली स्वारी
मी थोडासा चूकलो इथे शिंकली माशी
ती नव्या दमाची दुनिया तिच्या पायाशी
आता फक्त आठवणींना उजाळा देत बसतो
येऊन नये खपली म्हणून घाव कोरीत बसतो
आयुष्याच्या मागे एक राहीला होता दागिना
हे दैवाचे होते फेरे बाकी कोणी काही म्हणा
रस्ता माझा जरी बदलून जरी घेतो ग्लानी येते
ती कोठे त्या रस्त्यावर माझ्यासाठी चालतं असते
कोण तू? का घेऊन आला?, कळलीच नाही गीता
म्हणून मी आसवांवर रोजच लिहीतो कविता.....

-



नात्यांची ओढ असेल
तरचं नाते गोड ठरते....
नाहितर नात्यांत
केवळ तडजोड उरते.....

-



'तुला समजावतो धीर देतो
याचा तुला किती फायदा होतो माहित नाही'.
पण त्या दिखाऊ समंजसपणाच्या
उबदार शाली खाली माझाच सुटलेला धीर तग धरुन पुन्हा वाढीस लागलेला असतो.
"पण तू हे कुठे बोलू नकोस,नाहीतर खोट्या धिरोदात्तपणावर रचलेला माझ्या जगण्याचा पायाच हदरेलं अश्यानं ! "

-



'तुला समजावतो धीर देतो
याचा तुला किती फायदा होतो माहित नाही'.
पण त्या दिखाऊ समंजसपणाच्या
उबदार शाली खाली माझाच धीर तग धरुन पुन्हा वाढीस लागलेला असतो.
"पण तू हे कुठे बोलू नकोस,नाहीतर खोट्या धिरोदात्तपणावर रचलेला माझ्या जगण्याचा पायाच हदरेलं अश्यानं ! "

-



"मला नाही आवडलं,
असं एकदम घरात शिरणं. मी येणारच होतो नं,
बरं वाटल्यावर दोन चार दिवसात तिकडे.
एरव्ही अंगणातून खुणावत होतास तेंव्हाही जरा संकोचल्यासारखं व्हायचंच.
अगदीच निलाजरं नाही होता येत.
.... अरे हो, आवडतं म्हणून काय झालं?
जगाची काही रितभात असते की नाही? ...
आधीच त्याच्या व्याख्येत बसत नाही आपण, हे ध्यानात घे जरा."

-



आपण ज्या शब्दात
एखाद्या व्यक्तीबद्दल मत
व्यक्त करतो. त्यावरुन त्या
व्यक्तीची नाही....
आपली लायकी समजते.

-



तुझ प्रेम कमवण्याच्या नादात
आयुष्यात खूप काही गमावल,
इतका गुंतलो मी तुझ्यात
की मी मलाच विसरलो.
शेवटी तुझ्या विरहात झूरणेच राहिले बाकी...
गमावण्यास आता काही उरले न हाती.....

-


Fetching आदित्य लोकरे Quotes