घाई
मोठं होण्याची मी थोडी घाईच केली
मोठं होण्याच्या घाईत आपली माणस दुरावली
शाळेचे दप्तर वागवणारे खांदे आता जवाबदारी चे ओझे पेलवत पुढे चाल्ले आहे
मोठं होण्याच्या घाईत आईच्या आताचे दोन घास खायचे मात्र राहूनच गेले
मोठं होण्याच्या घाईत बाबांची विचारपूस करायची मात्र राहूनच जाते आता वाटते की बाबांच्या खुशीत दोन क्षण निजावे
मोठं होण्याची मी थोडी घाईच केली ताई सोबत गोळा खायची शर्यत करायची मात्र राहूच गेली
मोठं होण्याच्या घाईत साखर झोप घेण्याची मज्जा मात्र राहूनच गेली
मोठं होण्याची थोडी मी घाईच केली
~Ridz-
New 365 day's
New year brings another set of new clumsiness
New year brings the another set of new Hopes
New year brings the another set of new opportunities
New year brings another set of new manifestations.
New year brings another set of
New exploration with the same old squad!
~Ridz
-
आज 9 ऑक्टोबर 2024
आज देशाचा दिवा कायमचा विझला
म्हणजे भारताचे सगळ्यात मोठे उद्योजक
पद्मविभूषण सर रतन टाटा हे अनंतात विलीन झाले
रतन टाटा म्हणजे भारताला लाभलेले एक अनमोल रत्नच खरे
एक रत्न ज्याचे श्वानं प्रेम अफाट होते
एक रत्न ज्याने वित्तीय स्थिति पेक्षा
लोकप्रियतेचा अफाट सागर अनुभवला
सुधा मुर्तीनी तर या रत्नाला चक्क ध्रुव नक्षत्र ने संबोधले आहे आणि स्वतःचे रोल मॉडल देखील म्हटले आहे
तसे तर हे रत्न सर्वांचेच रोल मॉडल आहेत
अशा भारताच्या रत्नाला भावपूर्ण श्रद्धांजली
सर रतन टाटा तुम्ही नेहमीच जगातील प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात राहाल
Legends always stays!
~Ridz-
स्वातंत्र्य
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून अठ्ठ्याहत्तर वर्ष पुर्ण झाली ते फक्त हिंदू-मुस्लिम बांधवांच्या फहळणी करिता का?
आज आपण स्वातंत्र्याचे जे धडे किरवत आहोत ते फक्त आधुनिक संस्कृती जपण्यासाठी का?
आपली भारतीय संस्कृती जपत ज्या स्त्रीया बाहेर च्या जगात वावरू पाहत आहेत त्या खरच स्वतंत्रपणे वावरत आहेत का?
15 ऑगस्ट 1947 साली मिळालेले हे स्वातंत्र्य आपण खरच जपत आहोत का
आपला देश खरंच स्वतंत्र झाला आहे का?
~RIDZ
-
हिंदुत्व
स्वराज्याच्या लढाई मधे जिंकलेले आपले हिंदुत्व आपण खरच जपु पहातोय का?
हिंदुत्ववाचे गिरवलेले धड़े खरच आपण अमलात आनु पहातोय का?
हिन्दू-मुस्लिम भाई-भाई चे नारे देताना आपण आपल्या हिन्दुत्वाच्या मर्यादा तर विसरत चलल्लो नाही ना
राम मंदिर की मजिद या वादगस्ती मधे हिन्दुत्वाचा पोषिन्दा या कलियुगात हरवत तर नाही चाल्ला ना?
~Ridz-
एक पत्र
एक पत्र माझ्या लाडक्या बाबांसाठी
प्रिय बाबा
मे महिना म्हणजे उन्हाळय्याच्या सुट्या
मे महिना म्हणजे पहिली आंब्याची पेटी
पण हे सर्व दुसऱ्यांसाठी आमच्या साठी मात्र
मे महिना म्हणजे तुमचा जोरदार होणारा वाढदिवसच जो सणा पेक्षा कमी कधी वाटलंच नाही
तुम्हाला जाऊन आता चार वर्ष झाली पण
ती चार वर्ष कशी गेली कळलं नाही
आजही तुमचा वाढदिवस आम्ही साजरा करतो बरका
चार वर्षांत मला वाटलं ही नव्हतं की मी खरंच काही करू शकेल कारण तुम्ही असे कधी आम्हाला सोडून जाल अस कधी वाटलंच नव्हतं
जेव्हा मी दुसर्यांना त्यांच्या बाबां सोबत बघते तेंव्हा खरंच खूप jelous फील होत की तुम्ही आत्ता इथे का नाहीय
पण मम्मी नेहेमी असते माझं सगळं करायला हे बघून खूप समाधान मिळत
पण तुमची माझ्या आयुष्यातील जागा कोणी कधीच भरून नाही काढू शकत हे नक्की
मी ठरवलेले तुम्हाला द्यायचे ते nike चे shoes अजूनही माझ्या bucket list मध्ये आजून आहेत कारण मला माहिती आहे की आपण एक दिवस नक्की भेटू कारण आपली तर शेवटची भेट अजून बाकी आहे ना
Happy birthday papa
I wish you were here
जरा दोन दिवस आधीच wish करते आहे
करणं मी नेहेमीच तुमच्या birthdayसाठी excited असते आणि कायम राहील
तुमची chakuli
तुम्ही दिलेली बाकीची नाव मी नाही लिहू शकत😁
~Ridz
-
बाबा
बाब आजही मी तुमचा हाथ धरून ठेवलाय
तुम्ही सोडायची घाई का केली
कोणी विचारले तुझ्या प्रेमाची definition काय तर तुमच्या निखळ प्रेमाचा प्रवास आजही मी जपून ठेवलाय
आजही माझ्या कवितेचा सारांश तुमच्यापाशी येऊन संपतो मग तुम्ही कवीता सुरू करण्या आधीच कवितेचा निष्कर्ष का काढलात
कीती लोटली वर्ष तरी आयुष्याच्या गाडी ला
बाबा नावच एक भाक्कम engine हे हवंच
असत.
~Ridz
-
Old school love
Text messages नाही तर love letters म्हणजे old school love.
Expensive gifts नाही तर गुलाबाचं फुलं म्हणजे
Old school love.
Starbucksची कॉफी नाही तर टपरी वरचा चहा म्हणजे old school love.
Benching नाही तर stick to one चा फॉर्म्युला म्हणजे old school love.
Situationship नाही तर जन्मभराची साथ म्हणून
Old school love.
~RIDZ
-
प्रेम
चलना पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पडुयात
दोन कटटिंग चहाचे प्याले पुन्हा त्या पावसात तसेच सोडून जाऊयात
प्रेमाने आणलेलं ते गुलाबाचं फुल आता मोगऱ्याच्या फुलांनी मात्र बदलून टाकू
कारण नको आता ते गुलाबाचे काटे
आता वेचुयात वाटेतील मोगरा अन जाईचे फुले
चलना पुन्हा नव्याने प्रेमात पडुयात
एकमेकांच्या सुख दुःखात नव्याने सोबती होऊयात
चलना पुन्हा नव्याने प्रेमात पडुयात
पहिल्या भेटीचे ते क्षण पून्हा नव्याने अनुभवूयात
~Ridz
-
Over a coffee table
Let's meet over a coffee table
And talk about the day
Let's meet over a coffee table
And talk about the fluctuating politics
Let's meet over a coffee table
And cry about the life we never wanted to live
Let's meet over a coffee table
And tell me about that girl you once had a feelings for
Let's meet over a coffee table
And gossip about the work environment we are stressed about
Let's meet over a coffee table
And have multiple coffees together
And talk about our never ending love story!
~Ridz-