मन मोगरा मी तुझा गजरा गं
केसामध्ये तुझ्या सखे दिसे साजरा गं
तुझे केस ओळे सकाळी सकाळी
मन मोर झाले सकाळी सकाळी
जीवाच्या सुखाला तुझा आसरा गं
मन मोगरा मी तुझा गजरा गं
गुलाबी फुलासम दिसे धुंद काया
तापत्या उन्हात जशी थंडगार छाया
काळजात बसला तुझा चेहरा गं
मन मोगरा मी तुझा गजरा गं
जेव्हा मोकळा तू सखे श्वास घेते
किती सांगू धडधड काळजात होते
प्रेमाच्या सरीने भिजावी धरा गं
मन मोगरा मी तुझा गजरा गं-
तुला कळणारच नाही का कधी
माझ्या आतली धग? ?
तू पण कधीतरी
मी होऊन बघ.....!!
-
एकमेकांवर प्रेम भरभरून करतो
पण काही काळाने शेवटी
आयुष्य कोऱ्या करकरीत कागदासारखच राहतं....
-
माझ्या पत्रात रोज तुझ्या
आठवणीची एक ओळ असते
ते तुझ्या पर्यंत पोहचून सुद्धा
तु वाचत नाही हिच मला खंत वाटते....-
रोज वाटे.....
रोज वाटे तु दिसावे
सोबतीने मी असावे
हे अनोखे वेड आहे
हि निराळी ओढ आहे
पाहता तुला मन भान हरवले
मन असे कसे तुझ्यात गुंतले
सुखाच्या सरीचे नवीन गाणे
पुन्हा पुन्हा हे गुणगुणायचे
सुगंधीत क्षणांचे हे रंग सारे
जणू धुक्यात उलगडायचे
मी भिजावे
मी रूजावे
अंग अंग थेंब थेंब हे भिजे
मी गुंतवावे
मोहरून जायचे हे वय असे
जाणता तुला भान हरवले
मन असे कसे तुझ्यात गुंतले. ....!-
तुझ्या प्रेमाची मेहंदी
आज मेहंदी काढली मी हातावर बर्याच वर्षांनंतर
तुला आवडायची ना मेहंदी काढायला तुझ्या हातावर
तो गंध आजही दरवळतो माझ्या अवतीभवती
मला घेऊन जातो त्या पंचमीच्या झोक्यावर
आणि श्रावणाच्या सरीमध्ये
मला आजही आठवतयं
तो डोळ्यासमोर येणारी लड
तुझ्या हाताने बाजूला करायची
आणि झुलत राहायची झोक्यावर
मी एकटक पाहत असायचो
माझ्या घराच्या खिडकीतून
वर्ष झाली आता या गोष्टीला
तू येणं हि बंद केलसं
आणि हो! आता ते लिंबाचे झाड हि राहिले नाही
मी आजही कधी कधी तिथे जातो
आणि तुझी निष्फळ वाट पाहत असतो
तसाच तो लिंबहि तुझी वाट पहात असेल
कदाचित म्हणून मला काल त्याच्या
गाभाऱ्यात एक पालवी फुटलेली दिसली
एका नव्या आशेची, तुझ्या येण्याची
आज मेहंदी काढली मी बर्याच वर्षानंतर
तुला आवडायची ना तुझ्या हातावर काढायला. ...-
दिला पित्याने हा ठेवा
दिले आईने वळण
ही ग सोन्याची कोयरी
सई, सांभाळ जपून. .....-
जेव्हा तूच पाणावतेस तेव्हा छातीवरून ढग सरकतो
माझ्या देहाची ढाल होते माझा हात तलवार होतो..-
क्षमा
रूप, गंध, आकार, विकार
असतो कि नाही माहित नाही
पण ...!क्षमा सोबतीला असावी
कधी चुकतो
कधी कधी तुझं माझं करतो
तेव्हा क्षमा सोबतीला असावी
कधी कधी एखाद्याच्या मनावर
वाईट शब्दांचा आघात होतो
तेव्हा क्षमा सोबतीला असावी
कधी कधी नाती जपताना
दुरावा येतो
तेव्हा क्षमा सोबतीला असावी
अन् नात्यात गोडवा निर्माण
करायचा असेल तर सोबतीला क्षमा
असावी
येते वेळी अन्
जाते वेळी. ..... सुद्धा
क्षमा सोबतीला असावी
याला एकच कारण. .....
माणसाने माणसाशी माणसासारख वागणं
हि एकमेव क्षमता प्रत्येकाच्या अंगी असावी. ...
-