Everything For Everyone
So Be Yourself & Be Happy Forever ...
Happy Women's Day 🌷🍫❣️🤝-
काय सांगू माझ्याबद्दल ????
नावातच सार काही
भावनेला वेळेची
जरा भलतीच घाई ,
सुख दुःख... read more
जो पूरी विश्व को ऊर्जा दे
संयम और स्थिरता का प्रमाण है ,
चराचर का हर मनुष्य प्राणी
जिनको अपना आदर्श मानता है !!-
न जाने कितने ख्वाब अधुरे रहगये,
पर करने थे जिनको दिलसे पूरे वो,
हिसाबही कुछ बेहिसाबसे निकले !!
20th Jan 2024
11.53 pm
-
काय बोलू, कसे बोलू
ओठी शब्द येत नाही
माझ्या मनातले का बरे
तुझ्यासमोर लपूनच राहत नाही ??
अनुभवाचा हा अल्लड खेळ
की नवरंग आपल्या प्रेमाचा ??
का छंद तुझा मला जपण्याचा की ;
का नवा विचार प्रेमात पाडण्याचा ??
क्षण ते असो कोणतेही
नातं कधी दुरावलच नाही ,
विश्वासाच्याच त्या जोरावरच
चुकूनही,कोणतच गणित कधी चुकलं नाही
चुकूनही कोणतच गणित कधी चुकलं नाही !!!
१.५८ am
१८ जानेवारी २०२४
-
वरना सांस भी लगातार आये
तो रोकने अस्पताल जाना पडता है ....-
ती अनोळखी वेळ..
होता आयुष्याची कातरवेळ
मन घालितो सुखांचा मेळ,
रमला जीव तो त्या दिवास्वप्नात
तोची मना साद घाली ती अनोळखी वेळ
पुन्हा त्या सुखदुःखाचे
अचानक नकोसे येणे झाले ,
जणू त्याच दिवास्वप्नातून
माझेच मन पुन्हा नव्याने जागे झाले ,
काय तो अनुभव काय ते जगणे
उरे इथे फक्त नित्य नव्यानं अनुभवणे,
जणू हाच जीवन प्रवास प्रत्येकाच्या आयुष्याचा
अन कोड्यातूनच उत्तरतो क्षण प्रत्येक पुढचा !!
©Praj
28 th Oct 2023
3.10 pm-
आपलंच मन कदाचित......;
लिहिता लिहिता शब्दांना
विराम यायला लागला
की ओळखावं खूपच खरं
आणि धगधगतं बोचरं असं;
मनातलं काही तरी ओठांवर येत असावं ..
आणि काळाच्या पडद्याआडून
त्याला "मनाचा लगाम"
आपलंच मन कदाचित देत असावं ;
©PraJ
11Oct 2023
12.31am
-
एकदा कधीतरी कुठेतरी सापडते ,
अनोळखी होऊन आपल्याशीच
नव्यानं हितगुज करते ,
वाटतं तेंव्हा ती आपल्यातच होती का ??
परत वाटतं मग ती भेटत नव्हती का ??
असंख्य विचार "कवी वेडं मन" करत रहातं
अन आपल्याच कलेला पुन्हा पुन्हा पहात राहतं..
वाटतं तेंव्हा सांगावं त्या वेड्या मनाला समजवाव ;
अन आपल्यातल्याच दडलेल्या त्या कवितेला
त्या कविमनानं नित्य नव्यानं भेटत राहावं!!-
आपलं कुणी कितीही वाईट जरी केलं ,
आणि आपल्या हातून चांगल्या हेतूनं
चूक जरी झाली असली तरी.......... ;
ती निस्तरण्यासाठी माणूस जेंव्हा असमर्थ होतो, अगदी त्याच क्षणी "देवदूतासारखा कुणी तरी येऊन अचानक आपली खूप मोठी मदत करून जातो....."
याला काय म्हणायचं ?????
आईवडिलांची पुण्याई अन दैवी कृपा !!
आणि हितचिंतकांची साथ !!!
-