प्रयत्नांती परमेश्वर
म्हंटले असेच नाही.
प्रामाणिक प्रयत्नांनी
मिळते सर्व काही.
प्रयत्न वाळूचे कण
रगडता तेल ही गळे
प्रयत्न केल्यावरच
माणसाला हे कळे.
प्रयत्नांची पराकाष्ठा
आम्हा करायला हवे
योग्य तेची फळ
मिळवायला हवे.
प्रयत्न केल्यास
साद्य होइल सर्व.
साध्य झालेवर मात्र
करु नका गर्व.
प्राजक्ता आर. खांडेकर-
8 MAY 2019 AT 10:05