मातृत्व.....
मातृत्वाची भावना काय असते
हे मला एकदा अनुभवायचंय...
काय असते ती जबाबदारी
हे एकदा जाणून घ्यायचंय...
त्या कळीला उमलताना पाहायचंय
इवल्याशा पावलांना स्पर्श करायचाय..
बोबडे बोल आणि डगमगणारी पावले
प्रत्येक निरागस प्रश्नाला उत्तर द्यायचंय...
त्रास होईल थोडा व सोसाव्या लागतील कळा
पण गर्भात वाढणारं सुख मला अनुभवायचंय...!!!- Nikita Patharkar
9 DEC 2018 AT 18:10