आभाळात ढग एकमेकांना झुंजले होते ,
झाडी वार्या मध्ये गुंतले होते.
तू आलीस माझ्या आयुष्यात एक वेगळी बहार घेऊन ,
तुला पाहताच मन माझे चिंब भिजले होते.
चिंब भिजलेल्या मना मध्ये प्रेमाचा गारवा उठू लागला ,
तू बिना छत्री पावसात उभी होतीस, आणि मी छत्रीत असून ही हा पाऊस मला भिजू लागला , हा पाऊस मला भिजू लागला...
मनी वाटलं माझ्या तुझं नाव जाणून घेऊ ,
थोडीफार का होई ना जराशी ओळख करून घेऊ
आलो तुझ्यापाशी जेव्हा दोन शब्द तुझ्याशी बोलायला ,
अपेक्षान चा भंग केलास तू, 'बोला दादा' हे प्रतिउत्तर माझ्या दोन शब्दाना देताना...!!!
-