मी पन या जगात येउ शकते का ग आई ,
तुझ्या प्रेमळ हातांवर खेळू शकते का ग आई |
जगायचे असते ग मला पन या जगात ,
पन का साथ अशी अर्धवट सोडून देतेस ग आई
सुंदर असे हे जग पहायचे होते ग मला ,
खरच सांगते आई त्रास दिला नसता ग मी तुला
छोट्याश्या या डोळ्यात अश्रू आले ग मला ,
आई म्हनुनी हाक मारली असती ग मी तुला .
मुलगी म्हणून जन्म का नाकारला जातो ग माझा
खरच सांग आई मी गेल्याने त्रास कमी होतो का ग तुझा ..
मी गेले ग सोडुन तुझी साथ ,
सांग ना आई का धरला नाही ग तु माझा हाथ .
मला जावे लागले म्हणून रडू नकोस ग आई तु ,
पन पुन्हा अशी साथ सोडू नकोस ग आई तु .
सगळ्या जागाला सांग ना ग आई तु ,
मुलगी असो वा मुलगा बाळासाठी फक्त "आई" आणि "आईच" ग तु .......-
25 JUL 2018 AT 19:56