फुकटचे सल्ले ऐकायची तयारी ठेवा जेव्हा तुमची तब्बेत किंवा परिस्थिती खराब असते
-
English Blog link :
http://bhagwat-stories-travel.blogspot.com
कामयाबी...
अब बताभी दो राज तुम्हारी कामयाबी का
अब दोस्तो से क्या है छुपाना
उलझने भी आपने ढेर सारी सही होगी
क्या राज है उनका हल निकालना
क्या आपने भी हारा हुआ खेल खेला है
क्या रहस्य है उनको भी हराना
आखिर जिंदगी भी उस मोड पे गई होगी
जहाँ से रास्ता मुश्किल था चुनना
किसीं वक्त आंखो पर आसुओने दस्तक दी होगी
कैसे सीखा आसुओको संभालना-
नजर
सहृदयांची ती नजर मला छेदून गेली
लोकांची ती कृती मला भेदून गेली
विचारांची पातळी मला लाजून गेली
प्रतिमा खंडली पण कृती तारून गेली-
तापवू कधी तरी मैत्र भेटीची छान भट्टी
हसु मनसोक्त होईल आठवणीशी गट्टी
थोडी मस्करी होतील दिलखुलास गप्पा
हसत खेळत सजवू मैत्रीचा छान कप्पा-
आई....
काय सांगावी आईची महती
गाता-गाता होते ईश प्राप्ती
शुद्ध होईल मन करता गुणगान
माझी आई माझा स्वाभिमान-
कलह...
कोणाला गर्भ श्रीमंतपणाचा आव
नात्यावर करतात अति-आरामात घाव
कुटुंबात नाही राहिला विश्वासाचा ठाव
छोट्या गोष्टीवरून किती भांडतात राव-
लोक शांत आणि विचारी माणसांला मूर्ख समजतात जो पर्यंत माणूस त्याचे उपद्रव मूल्य दाखवुन देत नाही.
-
का विस्तवाशी खेळते आपलीच कथा
सतत का प्रयत्नांत मिळते व्यथा
संघर्षात मात्र मिळते फक्त अपयश वृथा
जीवनात सुख-दुख असते सापेक्ष यथा-तथा-
सुहृदय
येताना तयार होते हास्याची साखळी
जाताना तयार होते नीरव पोकळी
भविष्यासाठी नव सूर्य शोधावा लागतो
गतकाळाचा सूर्य आठवणीत बुडालेला असतो-