आयुष्याच्या पुस्तकात
आपली एक कहाणी आहे,
कधी रम्य बालपण
कधी मदमस्त जवानी आहे..
त्या कहाणी मध्ये
प्रेमाचं सदाबहार पान आहे
ते आहे
म्हणून तर जगणं छान आहे..
शब्द सारे कहाणीचे
चांदण्यांपरी चमकावे,
क्षणात रडावे, क्षणात हसावे
आयुष्य भरभरून जगावे..
आपली छोटी कहाणी
आपल्या मागे ही उरावी
अन् साठा उत्तरांची ही कहाणी
पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हावी..
आता एकच आस , एकच इच्छा
आयुष्याचा महोत्सव व्हावा,
सुरुवात तर छानच झाली
तसाच शेवट ही गोड व्हावा...
आयुष्याचा महोत्सव व्हावा...!!✨
-