Sharayu Nilwarn  
2 Followers · 1 Following

@manatlya_bhavana097 my Instagram account... Also follow me on this page
Joined 10 December 2021


@manatlya_bhavana097 my Instagram account... Also follow me on this page
Joined 10 December 2021
26 FEB AT 23:18

आज काल खूपदा असंच होतंय....
दिवसभर साठलेल्या दुःखाच ओझं...
रात्री झोपताना...
उशिला कवटाळूनच व्यक्त केलं जातंय...
- शरयू निलवर्ण

-


28 OCT 2023 AT 23:16

न मिळालेल्या गोष्टींचं, आता फार वाईट वाटत नाही....
कारण परिस्थितीशी adjust करायची, सवय झालिये आता...
                     - शरयू निलवर्ण

-


23 OCT 2023 AT 14:02

हातात मोबाईल
आणि कानात कॉड...
त्यामुळे वागणं-बोलणं बदलत चाललयं,
हे वाटत नाहीये का ऑड....

दिवसभरातल्या गोष्टी आता
जास्त शेअर होत नाही…
कारण इन्स्टा आणि फेसबुक पुढं
कोणाला दिसतंय का काही ....

इंटरनेट च हे जाळ...
हल्ली सगळीकडेच पसरतयं...
एक मेसेज केला की,
नातं काही क्षणात बहरतयं.....

व्हॉट्सअँप वर स्टेटस ठेवणार...
इंस्टा वर स्टोरी टाकणार...
मग त्या मोटिवेशनाल गोष्टी,
आचरणात कधी आणणार....

मोबाईल च्या या जगात ,
गुरफटलेल्या नात्यांची,
कोणी देईल का हमी...?
मोबाईलशी  जवळीक वाढत गेली...
आणि संवाद झाले कमी....
- शरयू निलवर्ण


-


18 OCT 2023 AT 22:51

प्रत्येक गोष्टी मनासारख्या घडत नसतात....
आणि जरी घडल्या,
तरी फार काळ टिकून राहत नसतात...
मग ते सुख असो किंवा दुःख...
- शरयू निलवर्ण

-


6 OCT 2023 AT 10:51

लहानपणी आई वडिलांचा हाथ पकडुन,
ही दुनिया फिरले....
आता फक्त एवढच मोठ व्हायचं आहे की,
त्यांनी माझा हाथ  पकडुन, ही दुनिया फिरावी...
                           -शरयू नीलवर्ण

-


26 AUG 2023 AT 22:56

उद्याची शाश्वती नसतानाही,
उद्याच्या चींतेत आजचा दिवस जगणं,
यालाच तर आयुष्य म्हणतात....
- शरयू निलवर्ण

-


30 JUL 2023 AT 0:32

पैशाच्या जोरावर टिकणारं नातं, आणि विश्वासाच्या जोरावर टिकणारं नातं, यात जमीन-अस्मानाचा फरक आहे....
ज्याला यातला फरक समजला तोच खरा श्रीमंत..
- शरयू निलवर्ण

-


20 APR 2023 AT 23:08

इतरांसोबतची कंपनी तर, सगळेच एन्जॉय करतात...
पण, स्वतःची कंपनी एन्जॉय करता आली पाहीजे...
- शरयू निलवर्ण

-


14 APR 2023 AT 9:06

आयुष्यातील अनुभव,
अनेक गोष्टी शिकवतात.
आपलं कोण, परकं कोण,
वेळेनुसार समजतात.

सुखाच्या क्षणात,
खूप लोक सहभाग घेतात.
दुःखाच्या वेळी मात्र,
अचानक गायब होतात.

गरजेच्यावेळी आपल्याला आठवणारे,
खूप लोक असतात.
पण गरज नसताना देखील, आपलेपणा दाखवणारे,
क्वचीतच काहीजण असतात.

म्हणूनच अशा लोकांना जपा,
ज्यांना तुमची किंमत आहे.
नाहीतर तुमचा फायदा घ्यायला,
साऱ्या दुनियेची हिंमत आहे.
- शरयू निलवर्ण

-


3 APR 2023 AT 22:24

एकच ईच्छा आहे...
कोणत्याच प्रवासाचा शेवट,
पापण्यांच्या काठावर होऊ नये...
- शरयू निलवर्ण

-


Fetching Sharayu Nilwarn Quotes