ram sakhare   (©️Ram Sakhare)
8 Followers · 7 Following

Joined 7 April 2020


Joined 7 April 2020
9 FEB 2022 AT 9:45

गोडवा मनाचा, हळव्या भावनांचा
तुझ्या माझ्या प्रेमाचा
रंगला खेळ मनी
तुझ्या माझ्या दिलांचा..

गोडवा मनाचा, हळव्या भावनांचा
घाट संपुष्टात आला अश्रूंचा
स्नेहभाव हृदयातल्या स्पंदनाचा..

-


30 JAN 2022 AT 14:28

आठवणी म्हणलं की आसवांचं बरसंण आलच
आणि त्या विरहाच्या आठवणी म्हणलं की उरात वणवा पेटतो..
विरहाच्या आठवणीत अश्रूंना वाट आपोआप मिळत जाते कारण त्या व्यक्तीचं वलय अजूनही हृदयावर बाकी असतं..

-


30 JAN 2022 AT 14:15

ये जिंदगी का कारवां है
इसमें गिरना-भागना तो ज़रूर है
इसमें असफलता की सीढ़ी भी चढ़ेगा
इसमें तू और तेरा मन भी थक जाएगा
बस रुकना नहीं, नहीं तो लोग कायरता प्रतिक समझेंगे
बड़े-बड़े कदम ना सही, छोटे-छोटे कदमों के साथ मंजिल को अपने गले लगायेंगे.. बस यहीं कोशिश करतें रहेंगे..!

-


19 JAN 2022 AT 22:41

ज़माने ने बदनाम किया है
अब मैं और मेरी तन्हाई ने
एकही मकान में
अपना बसेरा बसा रखा है

-


19 JAN 2022 AT 18:33

संकट आणि संघर्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,
आणि हे नाणं प्रत्येकाच्या आयुष्यात असतचं.
संकटाला सामोरे जाताना संघर्ष अटळ आहे परंतु यातून सदृढ आणि सामर्थ्यशाली जीवनाला गवसणी नक्कीच घालता येते.

संकटात संघर्षाची जाणीव जरा जास्तच प्रमाणात जाणवते,त्यामुळेच आयुष्याची खरी ओळख होते. संघर्षाशिवाय आयुष्य अधुरं हे तर सर्वज्ञात आहे,
या दोघांचा योग्य ताळमेळ साधून जीवनात उत्कर्ष करता येतो..

-


2 JAN 2022 AT 22:03

माझ्या आयुष्यात कमी आहे तुझी,
ती सलगी भरून काढण्यासाठी हात हातात तू देशील का?

माझ्या आयुष्यात कमी आहे तुझी,
असीम सागराला कवेत तू घेशील का?

माझ्या आयुष्यात कमी आहे तुझी,
झऱ्याला तुझ्या पात्रात संगम करून घेशील का?

माझ्या आयुष्यात कमी आहे तुझी,
वाटसरूला आयुष्याचा सोबती म्हणून साथ तू देशील का?

-


30 DEC 2021 AT 19:10

तुझ्यावर काव्यही केले,
प्रीतीच्या भावनांना शब्दरूप दिले..

तुझ्यावर काव्यही केले,
असीम प्रेमभावनेला हृदयातून रचले..

तुझ्यावर काव्यही केले,
लेखणीतून हर एक अलंकार तुझ्यावर लिहिले..

तुझ्यावर काव्यही केले,
तुझ्यामाझ्या प्रेमाचं रंगेबेरंगी चित्रसुद्धा रेखाटले..

माझा प्रत्येक प्रयत्न फोल ठरला,
तुला माझ्या प्रितीचा अर्थ न कळला..

-


27 DEC 2021 AT 18:50

सांग कधी कळणार भाव माझ्या मनातला..
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला..

-


23 DEC 2021 AT 23:11

निःशब्द मी आज
मनात दुःखास कवटाळले
अबोला तिचा पाहून
नयनी अश्रू बरसले

निःशब्द मी आज
वाद वेदनांशी होता माझ्या
अबोला तिचा पाहून
संवेदनाही बंद पडल्या माझ्या

निःशब्द मी , निःशब्द तू
अबोल तू , संवेदनहीन मी...

-


23 DEC 2021 AT 22:44

दिल में आज भी तुम्हारी आकृति स्पष्ट है,
बस इंतजार है तो
प्रकृति के स्वीकृति का..💯😌❤

-


Fetching ram sakhare Quotes