Kaustubh Chavan   (कौस्तुभ चव्हाण)
0 Followers · 1 Following

Write the Truth with Wisdom 😇
Joined 5 December 2021


Write the Truth with Wisdom 😇
Joined 5 December 2021
13 MAY AT 15:40

माझे मत

पक्षाच्या नैतिकतेला बघून सरकार घडवण्याची संधी देतो मी,
माझे मत देतो मी.

नेत्याच्या कामगिरीला एक संधी देतो मी,
माझे मत देतो मी.

शाश्वत सरकार घडवण्याची संधी देतो मी,
माझे मत देतो मी.

राष्ट्रहितासाठी एक हात देतो मी,
माझे मत देतो मी.

सामाजिक अडचणी निवारण्याची तुम्हाला संधी देतो मी,
माझे मत देतो मी.

एक विनंती करतो मी, दिलेल्या मताला जागण्याची हिम्मत ठेवा जरा म्हणतो मी.
मतदानाची चेष्टा नका करू सांगत, माझे मत देतो मी.

-


1 MAY AT 8:38

वीरांची बात आहे,
सह्याद्रीची साथ आहे.
शिवशंभू चे आशीर्वाद आहे, जिंकण्याची आस आहे.

जिजाऊंची निती आहे,
शूरवीरांची कीर्ती आहे.
तुकोबांच्या अभांगा सोबतच, ज्ञानोबांचे चमत्कार आहेत.

गडदुर्गांची कणखरता आहे,
सागराचा अथांग क्षितीज आहे.
फुलपाखरांची सुंदरता आहे, आणि वाघाची निर्भयता आहे.


मुंबईची आधुनिकता आहे,
पुण्याची सौंस्कृतिक शोभा आहे.
प्रत्येक जिल्ह्याच्या येथे, एक वेगळाच इतिहास आहे.

गाई मध्ये आई आहे,
तर तुळशी मध्ये ताई आहे.
प्रत्येक स्त्रीला येथे आदरणे वागवण्याची रीत आहे.

अष्टविनायकाची छाया आहे,
ज्योतिबा खंडोबाची महिमा आहे.
साईंच्या श्रद्धे सोबत, स्वामींवर ही निष्ठा आहे.

कला, विज्ञान आणि वीरता सोबत,
भक्ती भावाची महिमा आहे.
असा माझा महाराष्ट्र आहे, असा माझा महाराष्ट्र आहे 🚩

-


25 APR AT 15:25

Every cut that bled my Ego, made me more resilient for my Self respect.

-


16 APR AT 0:34

आठवण-२

रोज भेटू वाटते त्याला,
"आज काय झालं माहिती " बोलून सगळं सांगू वाटते त्याला.

रोज भेटू वाटते त्याला,
"बाजारातून काय आणलं?" हे विचारू वाटते त्याला.

रोज भेटू वाटते त्याला.
"आज एकाच ताटात जेवू" असे म्हणू वाटते त्याला.

रोज भेटू वाटते त्याला,
अजून थोडा वेळ थांबना असे सांगू वाटते त्याला.

रोज भेटू वाटते त्याला,
अनोळखी जगात ओळखीचा स्पर्श मागू वाटतो त्याला.

रोज भेटू वाटते त्याला,
अस्वस्थ मनाची व्यथा सांगू वाटते त्याला.

रोज भेटू वाटते त्याला,
पण पाणावलेल्या डोळ्यांनी फक्त आठवणीत दिसतो तो मला.

-


16 APR AT 0:26

आठवण-१

रोज भेटू वाटते तिला,
"आज काय झालं माहिती " बोलून सगळं सांगू वाटते तिला.

रोज भेटू वाटते तिला,
"बाजारातून काय आणलं?" हे विचारू वाटते तिला.

रोज भेटू वाटते तिला,
"आज एकाच ताटात जेवू" असे म्हणू वाटते तिला.

रोज भेटू वाटते तिला,
अजून थोडा वेळ थांबना असे सांगू वाटते तिला.

रोज भेटू वाटते तिला,
अनोळखी जगात ओळखीचा स्पर्श मागू वाटतो तिला.

रोज भेटू वाटते तिला,
अस्वस्थ मनाची व्यथा सांगू वाटते तिला.

रोज भेटू वाटते तिला,
पण पाणावलेल्या डोळ्यांनी फक्त आठवणीत दिसते ती मला.

-


3 MAR AT 20:22

गोष्ट काही वर्षांपूर्वीची,
स्वकियांसोबतच्या युद्धाची.
अपमानाचे विष पचविण्याची,
स्वाभिमान सारा जपण्याची.

गोष्ट काही वर्षांपूर्वीची,
दिलेला शब्द पूर्ण करण्याची.
हजार विघ्न पेलण्याची,
एकांतात आयुष्य जगण्याची.

गोष्ट काही वर्षांपूर्वीची,
दुनियादारी दाखवणाऱ्या दिवसांची.
भ्रमित करणाऱ्या चकव्याची,
आणि मोहात अडकवणाऱ्या फासाची.

गोष्ट काही वर्षांपूर्वीची,
जिवाचं रान करण्याची.
आखलेल ध्येय गाठण्याची,
प्रसिद्धीच सुख पाहण्याची.

गोष्ट काही वर्षांपूर्वीची,
मला घडविणाऱ्या त्या दिवसांची.
आयुष्यातल्या त्या टप्प्याची,
'आपले कोण' हे दाखविणाऱ्या सत्याची.

-


28 FEB AT 11:41

|| मराठी ||

मराठी ही भाषा अशी,
भरकटलेल्या मनाला सावरणारी कथा जशी.
मराठी ही भाषा अशी,
इतिहासातील प्रमुख गाथा जशी.

मराठी ही भाषा अशी,
पंच रसाची थाळी जशी.
मराठी ही भाषा अशी,
दुधावरची साय जशी.

मराठी ही भाषा अशी,
हिमालयाची श्वेत शाल जशी.
मराठी ही भाषा अशी,
सह्याद्रीतील जैवविविधता जशी.

मराठी ही भाषा अशी,
अरुणोदयाची परंपरा जशी.
मराठी ही भाषा अशी,
क्षीरसागरातील अमूल्य रत्न जशी.

मराठी ही भाषा अशी,
जपावी ती आपला स्वाभिमान जशी.
मराठी ही भाषा अशी,
वाढवावी ती आपल्या प्रगती जशी.

-


21 FEB AT 18:41

शिवभक्ताच्या नजरेतून

मानायला तुमची कीर्ती राजे, स्टेटस वर फक्त दिसतायेत भारी,
पण मानून घेण्यास तुमची कीर्ती राजे, नाही कोणाच्या मनाची तयारी.

उमजायला तुमचा प्रपंच राजे, पोवाडे नाही ऐकवले जात आता भारी,
पण प्रपंच तुमचा राजे, समजावणारी ४ विचित्र वाक्य कानी पडतात काहीतरी.

समजायला तुमचा इतिहास राजे, आता रीलस सगळे बघतायेत भारी,
पण समजून घेण्यास तुमचा इतिहास राजे, पुस्तके का वाचतील मग कोणीतरी.

मिरवायला तुमचा भगवा राजे, गर्दी भरपूर जमली भारी,
पण पेलवेल तुमचा भगवा राजे, असे प्रतापी नाही उरले आतातरी.

दाखवायला तुमचा अवतार राजे, दाढी चंद्रकोर लावणारे दिसतायेत भारी,
पण दिसावे तुमचे आचरण राजे, हल्ली नाही कोणाची ते टिकवण्याची तयारी.

बघायला तुमचे दुर्ग आणि किल्ले राजे, गिर्यारोहक सारे भरलेत भारी,
पण तिकवण्यास तो वारसा राजे, जणांची इच्छा आहे अपुरी.

तरी "राजे तुम्ही परत या", ही वाक्य गुंजतात भारी,
का येतील राजे परत, बघायला ही नौटंकी सारी.

-


17 FEB AT 18:29

साथ

जब पिता साथ होता है, तब बाजार का हर खिलौना अपना होता हैं।
जब माॅं साथ होती हैं, तब रसोई के खाने का पहला निवाला अपना होता हैं।।

जब भाई साथ होता हैं, तब हर महोल्ले मैं अपना राज होता हैं।
जब बहन साथ होती हैं, तब हर शिकायत का फरमान अपना पहले निकलता हैं।।

जब दोस्त साथ होता हैं, तब हर पल अपना लगता हैं।
जब प्यार साथ होता हैं, तब हर दिन सुहाना लगता हैं।।

जब साथ न कोई होता, तब हर क्षण अंजना लगता हैं।
चाहे साथ हो या न हो उसका, पर याद तो वह बहुत आता हैं।।

-


5 JAN AT 20:43

समुद्र त्याच्या किनारी, शंख शिंपले सजवत होता,
मात्र खोल गर्भात, मोती तो रुजवत होता.

समुद्र त्याच्या किनारी, पाऊलखुणा पुसत होता,
मात्र खोल तळाशी, इतिहास तो राखत होता.

समुद्र त्याच्या किनारी, रम्य देखावा दाखवत होता,
मात्र अथांग खोलात, नाविक तो घडवत होता.

समुद्र त्याच्या किनारी, मंद गीत गात होता,
मात्र खोल मध्यात, प्रलय गर्जना करत होता.

समुद्र त्याच्या किनारी, भरती ओहोटी खेळत होता,
मात्र त्याच्या खोलात, वादळ वारे झुलवत होता.

समुद्र त्याच्या किनारी, मला काहीतरी सुचवत होता,
मात्र त्याचा क्षितिज, मला आत बोलवत होता.

-


Fetching Kaustubh Chavan Quotes