शिवाजी सांगळे   (शिवाजी सांगळे🦋papillon)
3.7k Followers · 455 Following

read more
Joined 15 March 2018


read more
Joined 15 March 2018

प्रगती उन्नती

वैयक्तिक प्रगती उन्नती कुणाला नको असते? प्रत्येकजण त्याकरता झटत असतो कमीअधिक प्रमाणात यश अपयश देखील प्राप्त करतो.

काही सार्वजनिक उपक्रमात खास करून कला प्रांतात एकट्यानेच काही करू म्हणता, कितपत यश प्राप्ती होईल हे ठरवता येत नाही. त्याकरता परस्पर पुरक होऊन एकत्रित मेहनत केली तर तो प्रयत्न, प्रयोग जास्त प्रमाणात यशस्वी होऊ शकतो.

-




हरकत नसेल तर हो म्हणूयात?

मला वाटतं, व्हावा एक प्रयत्न
नि:संकोचपणे, दोघं बोलूयात...

तेव्हा नेमकं नवीन होईल काय?
काहीही होवो, कॉफी पिवूयात!

वाटलंच तर, मग हळूवारपणे,
विषयाला सुरूवात करूयात...

मी तर मनापासून खरं सांगतो,
पुन्हा नवीन सुरूवात करूयात...

-




प्रत्यक्ष ना जरी आठवणीत रोज पाही
दृढता एवढी नात्यामध्ये आपल्या
शरीरे जरी भिन्न विचारांत अंतर नाही

-



नयनरम्य जगात या, सारेच का व्यर्थ आहे?
नीट पाहता उलगडतो प्रत्येकात अर्थ आहे,
चौकटी बाहेरचा मनोहारी नजारा,खराखुरा
सुर्योदय की सुर्यास्त?विचारणे निरर्थ आहे !

-



, रोज का हादसा वही है
आवाज कहराता कुछ जाना पहचानासा वही है
सुना है, शहरों में आज कल रातें रंग बदलती है
चाहे जो हो, सभी दर्द का रंग तो एकसा वही है

-



उद्विग्न या मनाला प्रसंगी काहीच सुचत नाही
पुस्तक एखादे वाचणे या सारखा पर्याय नाही
बिथरलेल्या न् कोंडलेल्या अगणित विचारांना
काबूत ठेवून, शांत करणारा, दूसरा मित्र नाही

-



कवडसे तुज अस्तित्वाचे
रमता, रमून जाता विसरायला होते खरे भान वास्तवाचे

-



त्या
हल्ली पाठलाग असा का करती ?
उलटून गेलेल्या त्या सांजवेळा
अचानक उगाच पहाटे का स्मरती ?

स्पर्श,गंध, सहवास त्या वेळचा
राहतो रेंगाळत उगाच का भोवती ?
रंगाची उधळण समान भासते
जातेय गोंधळून म्हणूनी का मती ?

खरे खोटे जरी काहीही असले
तरी देई जगण्या भास ही स्फूर्ती !
पुनरपि यावे, क्षण ते सौख्याचे
चक्रे डोक्यात अताशा का फिरती ?

-



एकंदरीत काय तर, साराच आभासी खेळ
होत नाही जोवर, समोरासमोर भेटीचा मेळ

-



भिमरायाचं ज्ञान

-


Fetching शिवाजी सांगळे Quotes