प्राजक्ता वाघमारे-सोनावणे  
323 Followers · 59 Following

read more
Joined 4 February 2019


read more
Joined 4 February 2019

कितीही आणि काहीही झालं तरी
हार मानायची नाही पुन्हा उठायचं
गेलेलं सारं अवसानं परत आणत
स्वतःच स्वतःसाठी एकदा नव्याने लढायचं

खूपच हतबल झाल्यासारखं झालं तर
प्रवासात छोटासा स्वल्पविराम घ्यायचा
पण पूर्णविराम न घेता त्या प्रवासाला
पुन्हा नव्याने एक सोयीस्कर मार्ग द्यायचा

या प्रवासात अनेक लोक समोर येतील
ज्यांच्यामुळे जगण्याचे नवीन अर्थ कळतील
काही आपल्या फायद्याचे असतील तर काही तोट्याचे
ते सारे सोबत घ्यायचे कारण प्रत्येकातून काही न काही अनुभव मिळतील

शेवटी काय तर खडतर असो किंवा सोप्पा
हा मार्ग तर आपण सर करायचा
कोणाला बोलून नाही तर स्वतःच्या कर्तृत्वाने
आपला कोणी कधी न पाहिलेला चेहरा समोर आणायचा...

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे - सोनावणे

-



कधी कधी मनात दाटून येते
दूर दूर पर्यत चालत जावं एकटेच
कोणीच नसेल जेथे सतवायला
खोटे खोटे नाते भासवायला...


-



अशांत मन शांत होऊ पाहतयं
थोडं थोडं स्वतःला सावरू पाहतयं

न बोलता कोणाशीच काही
अबोलपणे सारं काही पारखू पाहतयं

कठीण प्रसंगात कोणालाच साद न घालता
कोण धावून येतो स्वतःच हे निरखू पाहतयं

आयुष्याचा दूरवरचा प्रवास सर करताना
चालता चालता मध्येच दूर धावू पाहतयं

अनोळख्या वाटेवर थांबून मग
पुन्हा आपल्या विश्वात परतू पाहतयं

खरंच अशांत मन आता शांत होऊ पाहतयं
स्वतःमधल्या स्वतःलाच नव्याने शोधू पाहतंय...

@शब्दांचीगुंफण प्राजक्ता वाघमारे-सोनावणे

-



मी लिहलेली लावणी आहे नक्की सर्वांनी पहा आणि like comment आणि शेअर करा प्लिज🤗🙏

-



आयुष्यात किती जरी अडचणी आल्या तरी
तुझ्या फक्त आवाजाने आधार मिळतो
तू सोबत असो व नसो तरी तुझे अस्तित्त्व
ते मात्र सतत भासतं राहतं
जगातील सर्व नाती एका बाजूला आणि
मातृत्व ते मात्र एकाच बाजूला असतं
निस्वार्थ असणार अस कोणतं जर प्रेम असेल
तर ते फक्त नि फक्त तुझंच असतं....
Happy Mothers day mumma...

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे- सोनावणे

-



धुक्यातुनी वाट शोधताना
काट्याकुट्यातूनी चालताना
वळणावर एखाद्या वळताना
मी तुला जपणार आहे
दुःखात तू असताना
चालता चालता पडताना
आयुष्याच्या खेळात हार मानताना
मी तुला जपणार आहे
तू उदास असताना
उगाच भरकटताना
वादळात तू गुरफटताना
मी तुला जपणार आहे
खोटे खोटे हसताना
दुःख दाटून रडताना
आयुष्याचा कठीण प्रवास सर करताना
मी तुला जपणार आहे
तुला जपणार आहे...

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे-सोनावणे

-



मनाची पाने चाळताना
असंख्य अश्या त्यात खुणा सापडतात
हळूच मनाला स्पर्शून जाताना
आठवणींचे हेलकावे हळुवार देतात

अबोल असतात काहीश्या
तरी हव्याहव्याशा वाटत राहतात
असंख्य असणाऱ्या खुणांपैकी
काहीच खूप जवळच्या भासतात

कोणाला दिसो न दिसो त्या
पण आपल्याला मात्र जाणवतात
कितीही पुढे चाललो तरी
त्या मात्र सोबत चालत राहतात

खरच मनाची पाने चाळताना
प्रत्येकालाच काही खुणा सापडतात
काहींच्या पुसट होत जात असतात
तर काहींच्या मात्र प्रत्येक वळणार
पुन्हा नव्याने बहरत जातात...

-



मनाच्या कागदावर...

मनाच्या कागदावर तुझं चित्र रेखाटलं गेलंय
इंद्रधनू सप्तरंगानी जणू ते सुंदरसे सजलंय
प्रेमाच्या जाणिवांनी हलकेसे खुललंय
अबोल असून ही खूप काही हळूच बोललंय

आर्त ह्रदयाची साद ते सांगू पाहतंय
सुंदरश्या रंगछटामध्ये तुला लपवतंय
नवीन नवीन नातं ते सामावून घेतंय
हळूच मग प्रीतीचे प्रतिबिंब उमटवतंय

स्वतःच्या अस्तित्वात तुला शोधते
अन तुझ्यात जणू स्वतःला पाहते
खुललेलं ते चित्र पाहून लाजते
तुझ्या नजरेत प्रेम दिसता हलकेच हसते

-



थोडसं रुसणं असावं थोडसं फुगणं असावं
पण एकमेकांना सोडून जगणं मात्र नसावं

-


Fetching प्राजक्ता वाघमारे-सोनावणे Quotes