Veena Randive   (वीणा विजय)
36 Followers · 49 Following

शब्द वीणा
Joined 25 February 2020


शब्द वीणा
Joined 25 February 2020
12 MAY AT 16:53

मन कल्लोळ थोपवणे
कठीण आहे जोपर्यंत
बुद्ध समजणे
सोपे नाही तोपर्यंत

-


10 MAY AT 11:16


खळगी भरण्या पोटाची
चाड नसे या जीवाची
दाह सोसून उन्हाचा,
राख झेलते प्रपंचाची!!

-


14 MAR AT 6:33

विविध रंगांनी जगणे सुशोभित आहे
जीवनाचे रंग बदलणे सदोदित आहे..

इंद्रधनुषी रंगांचे पांघरूनी आवरण
सृष्टीतील चराचरांचे जगणे आनंदित आहे..

अनेक रंग लेवून मनात भावनांचे
निर्लेप देहाचे असणे कालातीत आहे..

अवघा रंग एक होतो नाम गजराने
एकच भाव आसमंती दरवळ सुगंधित आहे..

-


5 MAR AT 16:07

उब हलकी उन्हाची
हवी सावलीला,
मावळतीच्या किरणांना
सांज सोबतीला...

-


14 FEB AT 10:59

जेव्हा असतोस तू
तेव्हा जागेला ही अर्थ प्राप्त होतो,
प्रत्येक कोपरा न कोपरा
तुझ्या अस्तित्वाची दखल घेतो

कुठेही असलास तरी
कायम पाठीशी असतो,
तुझीच सावली ना मी
निरंतर आधार असतो

जीवन वाटेवर तुझं प्रेम
जगण्याचा श्वास आहे
कुणीतरी आपलं आहे
यातच सारं काही आहे.

सहवासाने फुललेले प्रेम
दिवसागणिक घट्ट होते
'बी माय व्हेलेंटाईन' म्हणत
साथ-संगत कायम असते

रुसवेफुगवे वादावादी,
ही वाट संसाराची
नव्या नवलाईची होते...
प्रेम व्यक्त करायला
जेव्हा व्हॅलेंटाईन डे चे निमित्त होते...

-


12 FEB AT 13:18

वचनात बांधणे शक्य नाही मला
सोबतीला राहिल खात्री देतो तुला

-


8 FEB AT 18:06

कोई खास शिकायत तो नही,
बस हलकासा मनमुटाव हैं।
जो बात खलती है मुझे,
उसी से क्यूं लगाव हैं।
बस इतनीसी बातसें बेबनाव हैं,
बाकी तो सब ठीकठाक हैं।

-


17 JAN AT 8:59

नवे रस्ते
नवी उमेद
नागमोडी वळणे
भविष्याचा वेध

-


8 DEC 2024 AT 15:15

अशी ही नव्हाळी, उन्हाची झळाळी...
न मागता यावी, सोबतीने हवा ही...
ओढ ही हवीशी, तृणांना नभाची...
ऊब कोवळी, पांघरावी सकाळी...

-


19 NOV 2024 AT 17:20

प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्री असते
तर मग यशस्वी स्त्रीमागेही पुरुष असतोच की!

तिच्या भूमिकेला योग्य न्याय देत-
पुरुषी परंपरेची जोखड उतरवत
तोही देतोच तिला मुक्त स्वातंत्र्य
व्यक्त होण्याचे!!

बदलवतो अर्थ मिठीचा
तिच्या अश्रूंना कवेत घेत,
अन् मस्तक टेकवून शमवतो वेदनांना
स्पर्शाचे नवे संदर्भ जोडत.....

-


Fetching Veena Randive Quotes