सावरण माझ्या हास्याची,
मी पडद्याआड केली होती...
उमकळुन आलेली ती खळी,
गालावरच विरघळली होती..
तुझ्या येण्याची चाहूल सख्या,
मनाला कचकटून आवळली होती.
हळूच पसरलेली लाली गालावर,
शरमून लालबुंद ती झाली होती..
हरकून गेल्या माझ्या भावनांनी,
बाजू जमेची क्षणात विणली होती..
नजरभेट होताच काय करावं??
याच विचारात देहबुद्धी हरविली होती..
-