पाहते रे मी तुला,पाहताना तू मला,
पाहताना तो किनारा, विसावते मी पुन्हा....
निवांत या लाटांवर पडणाऱ्या किरणातला
प्रेमरंग तो नवा, वाटतो हवा हवा....
श्वासांमध्ये तुझ्या असा श्वास माझा गुंतला
गुंतूनीही लुप्त ह्यावा तसा मला तो भासला....
स्वरातूनी स्वरांमध्ये स्वर हे गुणगुणावे
त्रास हा नवा नवा, हवा हवा वाटला....
दूर जाता तू पुन्हा, श्वास माझा थांबला
तरी एक गोड हास्य गालावरी का पुन्हा....
-