QUOTES ON #माती

#माती quotes

Trending | Latest
4 JUL 2020 AT 19:26

ओल्या शुभ्र धुक्यात पानावली ही माती,
येता तुझ्या कवेत विसावली सारी नाती....!!!!

-


17 APR 2021 AT 0:39

माती विकून पायाला माती लागणार नाही असे,
त्यांनी महाल उभे केले...
त्यांच्या घरी बाग ही दिसत नाहीच!
ज्यांनी रान उध्वस्त केले..
©समीक्षा भुसारी✍

-



जिच्या उदरात जन्म होतो ती माता
आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती
यातील वेलांटीचा फरक म्हणजे माणसाचं आयुष्य...

-


30 APR 2020 AT 12:27

ह्या #शरीराची जेव्हा होईल माती...
रडतील तेव्हा खूप सारी #नाती...

-


26 JUN 2019 AT 14:47

तृणरंध्रावरती अलवार तरळून जावं
ओल्या मृदगंधात गंधाळून यावं
दाटलेल्या गुलाबी धुक्यासवे आयुष्य
नकळत चिंब दवांत न्हाऊन निघावं
-काव्यामृत

-


22 JAN 2021 AT 19:49

माती
माती आहे माझी,
मातीमध्ये खेळण्यासाठी.
माती आहे गोड पक्षाची,
मातीमध्ये लोळण्यासाठी.
माती आहे सैनिकाची,
मातीमध्ये रूजण्यासाठी.
माती आहे प्राण्यांची,
मातीमध्ये बागडण्यासाठी.

खरतर माती कोणाचीच नाही,
आपण आहोत मातीसाठी,
माती होऊन उरण्यासाठी..


-


12 OCT 2020 AT 10:02

एका नवख्या अंकुराचं
स्वप्नं असतं निराळं
रुजतो असा घट्ट मातीशी
गाठणं असतं आभाळं

-


29 JUN 2017 AT 12:10

तुंबडून वाहतेय शत्रूवृत्ती
जबाबदार आहे
द्वेष-ईर्ष्या-क्रोधचा अवकाळी ऋतू
वाढवत चला माणुसकी
प्रेम पुष्पांचा बांधून सेतू
~वसीम शेख

-



कुणाचा जन्म कुठे व्हावा
हे नाही कुणाच्या हाती
नश्वर या देहाची आपुल्या
अखेर होते माती

कोणी नाही इथे कुणाचे
फक्त स्वार्था पुरती नाती
चेहऱ्यावरच्या हास्या मागे
द्वेष मत्सराच्या ज्योती

दिवसा मागून दिवस गेले
जातील राती मागून राती
माणूसकीहून श्रेष्ठ नाही
धर्म आणि जाती

-


7 SEP 2020 AT 19:43

दवबिंदूच पण कसं असतं ना, जो पर्यंत पानाला
चिटकुन आहे, तो पर्यंत त्याच आयुष मोती बनून राहते
एकदा जर त्याने त्याची जागा सोडली तर,
त्याच आयुष माती बनायला वेळ लागत नाही

-