QUOTES ON #माणूसकी

#माणूसकी quotes

Trending | Latest

पैश्यात तोलणाऱ्या माणसांना पाहिले मी
जहरी बोलणाऱ्या माणसांना पाहिले मी !

झोळी पसरणाऱ्या गरीबाला पाहिले मी
रस्त्यावर तडफणाऱ्या जीवाला पाहिले मी !

सिमेवर शहीद होणाऱ्या जवानांना पाहिले मी
पाठिमागे निंदा करणाऱ्या खूप जनांना पाहिले मी !

बलात्कार करणाऱ्या नराधमांना पाहिले मी
अंधश्रद्धेखाली लुबाडणाऱ्या देनद्रोह्यांना पाहिले मी !

माय बाप नकोशे झालेल्या आजकालच्या पुंडलिकांना पाहिले मी
लेकरांच्या प्रेमासाठी तळमळणाऱ्या वृद्धाश्रमांना पाहिले मी !

फक्त एक कमतरता भासते हो मला जरी येवढे पाहिले मी
खूप दिवस झाले हो माणूसकीतला माणूस नाही पाहिले मी !

-


17 MAY 2022 AT 11:47


जे काही आपल्याला दुसऱ्याकडून अपेक्षित असते
ते त्यांना सुद्धा आपल्याकडून त्याच प्रमाणात
किंबहुना कमी जास्त प्रमाणात
किंवा आपल्या कुवतीप्रमाणे देता आले पाहिजे
तरच पुढच्याकडून अपेक्षा करावी

मुळात देताना घेताना स्वार्थ हा नसायला पाहिजे पण .... हल्लीच्या जमान्यात तर सध्या असेच चित्र पहायला मिळते.

'खरे तर आपल्यामध्ये जिव्हाळा , प्रेम , दया निस्वार्थ असणे हे माणूसपणाचे लक्षण आहे. ' पण ते कुठे मिळते पहायला ?

-



कुणाचा जन्म कुठे व्हावा
हे नाही कुणाच्या हाती
नश्वर या देहाची आपुल्या
अखेर होते माती

कोणी नाही इथे कुणाचे
फक्त स्वार्था पुरती नाती
चेहऱ्यावरच्या हास्या मागे
द्वेष मत्सराच्या ज्योती

दिवसा मागून दिवस गेले
जातील राती मागून राती
माणूसकीहून श्रेष्ठ नाही
धर्म आणि जाती

-


17 MAR 2021 AT 14:16

वचन असते दोघांचे तर का तिने एकटीने
संसाराचे गाडे ओढावे ओझे सारेच रेटावे

त्याने तिच्या आजारात
थोडा हातभार लावला
तर काय बिघडले
संसाराचा हा खेळ नियतीने चाले
माणसच मांडतात कधीकधी पसारे

कर्मानूसार फळही मिळे
काळाचा घात कूणालाच न टळे
मग का मोजावे कूणी नाते पैशात
जाता जीव राही सारे धरणीवर
आजची ताजी ठळक घडामोड
उद्या उरते बनून अडगळ
मग का माणसाची फक्त पैशासाठी धडपड
नातीगोती ती टांगली खूंटीवर

सप्तपदी हूंड्यात बूडाली
माणूसकी कचऱ्याच्या डब्यात गेली
चालीरीतींखाली माणसच दबली
करणार काय मागून हूंडा
पूरतो का तो आयूष्याला
कष्टाने कमवा ना
नको त्या प्रथा आता तरी मोडा ना


-


19 MAR 2018 AT 22:13

अद्वैतची होते हे जगतात
मानव हा अवतरीला पृथ्वीवरं,
स्वतःच माणुसकीचा करुनी भेद
स्वकर्मी स्वतः धाडीला नरकास !!

-


21 DEC 2019 AT 22:36

मानुसकीच्या बाता...

बस्स झाल्या भाऊ आता
त्या माणुसकीच्या बाता
आचरणात आणा शिवराय
अन वाचवा दिव्या संग वाता.

जर पोरगं वंशाचा दिवा हाय
त पोरगी बी हाय जयती वात
नईच देल्ला आधार पोट्टयानं
त तेच पकडीन शेवटी हात.

पोरगा असो वा पोरगी
भेदभाव नसावा मनी
ज्याच्या नशीबात पोरगी
तोच हाय खरा धनी.

नका खुळू कया बापहो
करून गर्भाची खात्री
अश्यानं कसा जनम घीन
नव्यानं जिजाऊ सावित्री

✍अमित भांडे.




-


26 JUN 2017 AT 19:49

माणसाने बघ माणुसकीचा
घात असा केला।
माणसाचाच माणूसकी वरुन
विश्वास बघ उडाला।

-


11 SEP 2021 AT 10:38

एक वेळ दगडाला देवपण येईल हो,
पण माणसात माणूसकी सापडणं,
अशक्यच समजा..

-


8 FEB 2018 AT 7:49

माणुसकी हा काही शाळेत शिकविला जानारा धडा नाही,
तो स्वतःहून आत्मसात करावा लागतो.

-


7 FEB 2018 AT 1:33

पैसा पैसा नको
थोडं देव देव पण करा
गर्व थोडा सारा आणि
माणूसकीला धरा !
गर्वाशी मैत्री केली की
आपली माणसं गमवाल
माणुसकीला जपलं की
परकेही देखील कमवाल !
#आईबाबांची शिकवण

-