QUOTES ON #माणुसकी

#माणुसकी quotes

Trending | Latest
24 JUL 2020 AT 0:53

अश्या जगण्याला
जिथे खुप काही कमऊन ही
माणुसकी कमवता येत नाही
भरपूर पैसा असताना ही
प्रेम विकत घेता येत नाही
सर्व काही असताना ही
शांत झोप लागत नाही

-


11 AUG 2017 AT 21:53

झरा आटत चालला,
झरा आटत चालला
अजूनही बरेच दिवस होते उन्हाळ्याला
पाणी जणू बिलगले तापलेल्या धरणीला
कधी पुरात वाहवणारा पाऊस असा दुष्काळात लपलेला
थेंबाथेंबासाठी इथं प्रत्येक जीव तरसलेला
घशाला कोरड सुखाला मुरड भेगा पडल्या पायाला
पोरं नि पिकांची काळजी जाळतेय इथं मनाला
घरधनीण रोजच हात लावे कपाळाला
आलिया भोगासी सादर दोष देई नशीबाला
आणखी एक नवा विषय सापडला राजकारणाला
पाण्यासंगे माणुसकीही गेली काय रसातळाला

-


4 MAY 2021 AT 21:37

दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं.... आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे.
एक माणूस वीस पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही. आणि तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो.
धन्यवाद....

-



काल सारं गाव जिंकलेलं,
पैश्यांवर नाव जे कमवलेलं...
पैश्यांनी स्वार्थी जग वाहवत नेलं
आणि आज सगळच गाव खूप दूर गेलं...

काल खोटा विश्वास आपलासा वाटला,
आज खरा अविश्वासु मुखवटा उलगडून पाहिला...
काल खोटी ममता हक्काची वाटली,
आज मायेचा ओलावा खऱ्या अर्थाने अनुभवला...

काल माणूसघाणी वृत्तीनेच 'माणुसकी' म्हणून झेप घेतली
आणि आज गगनी अनपेक्षित पक्ष्यांची किलबिल निदर्शनास आली...
काल खोट्या भावनांच्या अंधाराआड अयोग्यतेला आधार दिला,
आज खऱ्या भावनांची गर्दी पाहता मनमोरही गहिवरला...

पण खरंच आज खूप आनंद झाला,
जगाला वेडं करणारा पैसाच खूप काही शिकवून गेला...
अनुभव द्यायला माणसं तर असतातच
पण आज पैसाही अनुभव देऊन गेला...

-


19 APR 2020 AT 17:33

माणुसकी विलुप्त होता
जलपात्र शुष्क, मन ओस होते ।
जल हेच जीवन उमजता
त्या अंतकाळी नेत्र ओलावते ।

-


21 JUL 2020 AT 12:42

लायकीचे एकक...
पद आणि पैसा ( चांगली आर्थिक स्थिती) , हे लायकी मोजण्याचे एकक नाहीत.., आणि नसावेत.

समाजात माणूस म्हणून वावरताना माणुसकी किती आहे.. आणि ,माणूस म्हणून आपण इतरांना कशा पद्धतीने treat करतो.., हे लायकी मोजण्याच एकक असाव..। मग , शिक्षित - उच्च शिक्षित असो अथवा नसो, उच्च आर्थिक स्थिती असो अथवा नसो..।

Doesn't.. Matter.

-


6 MAY 2021 AT 1:24


ब्लब चा शोध थाॅमस एडिसन ने लावला..
गुरूत्वाकर्षणाचा शोध न्यूटन ने लावला..
सुपर कम्प्यूटर चा शोध विजय भाटकर ने लावला...
पण खंताची बाब आहे की,
माणसाने माणूसकीचा अजून शोध नाही लावला...
©समीक्षा भुसारी✍

-



उच्च-नीचतेच्या मुसळधार पावसाला
माणूसघाणी वृत्तीच्या काळोखाचं आलिंगन...
मध्येच त्या सद्विचारांची भास्कर रुपी भेट अन्
सद्विचाराच्या पावलामागे माणुसकीच्या इंद्रधनुष्याचे दर्शन...

-



रागाला शब्दात कस तोलणार,ज्यांच्या पुढे
बोलून काही फायदाच नाही त्यांना काय बोलणार
माणूसकीवरुन कितीही विश्वास उडाला तरी
हा मानवी देह त्याच दिशेने वळणार....।

-


8 MAY 2020 AT 22:47

जिगरच्या जागी #जिगर आणि जिगऱ्यात माणुसकी लागते ...
आज घडीला दुसऱ्याचा #त्रास स्वतःला जाणवायला..

-