QUOTES ON #मराठी

#मराठी quotes

Trending | Latest
6 JUN 2021 AT 11:23

कळून ही ना, कळली मला ती
कोडी बनून, पडली मला ती

एकच प्याला, झाला आता तर
इतकी कशी, चढली मला ती

मिटता मिटं ना, सुटता सुटं ना
सवयी जशी, जडली मला ती

ती म्हणाली पुन्हा, भेटू नको, पण
स्वप्नात येऊन, धड़कली मला ती

एक उचकी ही आता, मला येत नाही
इतकी कशी, विसरली मला ती

-


1 SEP 2020 AT 10:09

उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया
झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

(उड़ता है मस्ती से, दौड़ता है तेज़ी से, रंग में आ गया है
झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट हो गया है )

-


28 NOV 2021 AT 14:53

"आई तिथेच उभी असते"
निरोप देण्यासाठी मला,
ती गावच्या वेशीपर्यंत येते.
चुरगळलेली शंभराची नोट,
पटकन माझ्या हातात देते.
काळजी घे बर म्हणताना,
ती डोळ्याजवळ हात नेते.
अगदी काही क्षणातच ती,
डोळ्यांमधून बरचकाही बोलते.
बोलणं चालू असतानाच,
बस येऊन उभी राहते.
निरोप घेताना मग तिचा,
माझ्याही डोळ्यात पाणी येते.
बस दूर दूर जात असताना,
मी मागे पाहत असतो.
धुळीच्या लोटांमधून पाहत असताना,
आई तिथेच उभी असते.

-


17 SEP 2018 AT 9:14

नात्याचा गुंता झाला की एकमेकांशी भांडू
सुटला गैरसमज की पुन्हा नवा डाव मांडू

-


29 MAY 2020 AT 21:33

जेव्हा पासून तुझ्याशी मैत्री केली,
मला जग आपलेशे वाटायला लागले,
याआधी कोणत्याही गोष्टीची सवय
नव्हती,पण आता जणू तुझी आठवण
येण्याचे रोगच लागले..!

-


22 NOV 2020 AT 9:27

आज बात संविधान के आठवीं अनुसूची की

-


27 SEP 2020 AT 9:12

अधीर होत मन हे , प्रयत्नागतीत यश शोधाया निघालं
हरले जिथे जिथे मग मी , मलाच गुन्हेगार ठरवू लागलं !!

शिखराच्या प्रेमागत पायाखालची जमीन ही , विनाकारण पाठीशी
नशिबानं चुकवला कधी तर , कधी तुझी इच्छाच नाही ती
मन हे चुकार हे , प्रत्येक गोष्टीत चुका शोधू लागलं
हरले जिथे जिथे मी , मलाच गुन्हेगार ठरवू लागलं !!

ध्येयामागे लागून किती क्षण गमावली , होते जे मी विसरून गेली
हाथी आता काही नाही तर आठवणी सुद्धा नाही ,
आपला दोष सर्वांवर देणार हृदय नशिबाला दोषी ठरवू लागलं
हरले जिथे जिथे मी , मलाच गुन्हेगार ठरवू लागलं !!

स्वतःला दोष देतांना मन खचले असं नाही
जे झालं ते झालंच पण माझ्यामुळेच झालं म्हणायला चुकले नाही
मेल्यागत गती स्वतःची केल्यावर मन स्वतःलाच सांत्वना देऊ लागलं
हरले जिथे जिथे मी , मलाच गुन्हेगार ठरवू लागलं !!

आली जीवावर उठून आता कारणं , मग मनच सखा होऊ लागलं
सारथी समजून त्या कृष्णाला , स्वतःशी स्वतःच लढू लागलं
फेटाळून लावले एवढे ही दोष , मी निरपराधी सिद्ध करून दाखवलं
जीवन खूप सुंदर आहे , आपण उगाच नष्ट झालेलं समजलं !!

-


17 APR 2019 AT 7:46

शब्दांची जागा बदलून वाक्याचा अर्थ बदलता येतो,
तेव्हा काही माणसांची जागा बदलून,
आयुष्याला नवा अर्थ नाही देता येणार का?

-


10 FEB 2021 AT 16:31

-


21 APR 2020 AT 16:27

पप्पा (Father)

मी तुमच्या विना एकटा
ना मला समजवणारे शब्द
ना कधी मिळाली शाबासकी
ना कधी मिळाला राग अन मार
ना माझ्यावर ओरडण्याचा आवाज
ना असा आवाज की, मी पाठीशी आहे
ना माथ्यावर पप्पी ना, गळे भेटण्याची संधी
ना -मार्गदर्शन, ना -प्रोत्साहन, अन ना -हमदर्दी.
ना मिळाले कधी प्रेम आणि फक्त मिळाला तो दुरावा
मिळाल्या त्या जुन्या आठवणी तेही फक्त रडण्यासाठी

-