QUOTES ON #बालपण

#बालपण quotes

Trending | Latest
11 DEC 2017 AT 20:16

बालपण हे कधी जगणार?
रोज पोटासाठी दारोदारी वणवण फिरतात
नाही डोक्यावर छप्पर कसे स्वप्न सुंदर जीवनाचे पाहणार?
कधी शिकणार आणि कशी भावी पिढी घडणार?

-


3 NOV 2019 AT 9:02

क्या लौट सकेंगे अब वो दिन मिल सकते हैं बचपन के साथी।
जब बैठ पीठ पर एक दूजे की हम खेला करते थे घोड़ा और हाथी।
हम जीवन के तंग झमेलों में सब बचपन के साथी भूल गये।
वो निस्वार्थ प्रेम सब भूल गये सब वादे और कस्में भूल गये।

-


7 APR 2019 AT 23:24

जिज्ञासा बालमन की,होती है बड़ी प्यारी,
हर बात पर सवालों की होती गोलीबारी,
ये क्या है?ये कैसे होता है?
इससे क्या होता?ऐसे हज़ारों सवाल,
किसके पास जाए, किससे पूछें,
सबसे बुरा होता है मां का हाल,
उनके लिए तो नया है सबकुछ,
सारा संसार एक खुली किताब हो जैसे,
अनोखी उनकी ज्ञान पिपासा,
बालमन की भोली जिज्ञासा।

-


22 JUN 2020 AT 13:15

साथ नाही माय बापाची
जाणीव होताच कर्तव्याची...

आस नाही बालपणाची
डोळी माया लहान भावाची...

अन्न ही गरज पोटाची
दशा होते अनवाणी पायाची...

नको भाषा ही उपकाराची
भीक नाही, ही भुक आमची...

-


9 MAY 2021 AT 21:30

व्यापता न येणार
अस्तित्व आणि मापता न
येणार प्रेम म्हणजे मातृत्व

-


15 NOV 2018 AT 12:47

बालपण होत आमच छान,
पिंजारुन टाकत होतो सगळ रान.
रानामध्ये जाऊन करत होतो फीस्ट.
क्षणादार्थ सगळ करायचो आम्ही फस्त.
अंगान बनलो होतो आम्ही धष्ट पुष्ट.

खेळ होते खुप मजेदार आवड होती त्यांची फार.
कधी सुर पारंबी, तर कधी चेंडुफळी
तर कधी लपंडाव, तर कधी पळापळी,
कधी हु तु तु , तर कधी विठीदांडी
कधी रुमाल पाणी, तर कधी सापसिडी.

दुकानात मिळत असे लिमलेटची गोळी
ती खाण्याची गंमत निराळी
सोबत असायची मित्रांची टोळी,
होती सारी मनान साधी भोळी

नव्हत कधी जात पातीच बंधन,
नव्हता कधी कपटी भाव, निरागस होत मन.
नसायच कधी मैत्रीमध्ये राजकारण.
मित्र आम्ही सारे एकमेकांचे जीव की प्राण.

पाहुन लहानांना, हरपते भान.
आठवून बालपण, प्रसन्न होते मन.
पुन्हा एकदा जगाव बालपण,
वाटुन जाते मनाला काही क्षण..

-


14 NOV 2019 AT 21:33

लहानपणीच्या निरागसतेच्या कथा मोठेपणी आठवल्या, की चेहर्यावर स्मितहास्य आल्यावाचून राहत नाही. मोठेपणीच्या जगात हरवून गेलो की बालपणाचा विसर पडतो खरां, मग माणूस मोठा झाला की तो समजून घ्यायला शिकतो. दुनियेसारखं मोठं होऊन जगायला शिकतो; अन् वागण्याला बर्याचश्या मर्यादा येतात, अर्थात तोच घालून घेतो. अगदीच स्पष्ट सांगायचं तर वागणं-बोलणं सुधारतं.
या सार्यात आपण वयाने मोठे झालो, तरी मनात जपलेलं असतं ते बालपण. जे मिञपरिवारासोबत, नवीन आलेल्या लहानग्या निरागस बाळासोबत नेहमीच खुलून येतं; नी या लटक्या मर्यादांचा विचार न करता, पाहीजे तसं तिथे मन बागडू लागतं. सगळ्या चिंता बाजूला सारुन मन रमतं. आपल्या दुर्लक्षित झालेल्या, छंदांना वाव देत आपल्या माणसांत जेव्हा आपण मनसोक्तपणे फक्त मनाचंच ऐकतो;
तेच खरं बालपण...
खरं सांगू बालपण आलं, की आली ती निरागसता अन् त्यातील निर्मळता. म्हणून प्रत्येकाने मनात जपलेलं बालपण मिळेल तसं, मिळेल तिथे, अनुभवायला काही हरकत नाही. नाही का?
असंच वयाने लहान किंवा मोठ्या असणार्या, पण मनात बालपण जपणार्या सर्व बालकांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

कु.अक्षरा संतोष ढगे.

-


28 APR 2021 AT 17:19

कागदाची "नाव" होती
पाण्याचा "किनारा" होता
मित्रांचा "सहारा" होता
खेळण्याची "मस्ती' होती
मन हे "वेडे" होते
कल्पनेच्या दुनियेत जगत होते
कुठे आलो या समजुतदारीच्या जगात
त्यापेक्षा ते भोळे
"बालपण" सुंदर होते....

-


14 NOV 2018 AT 11:46

आज त्या जुन्या आठवणींना
डोळ्यांसमोर आणायचं आहे मला ,
पुन्हा एकदा अनुभवायचं आहे
माझ्या हरवलेल्या बालपणाला.

त्या प्रत्येक छोट्या गोष्टींमागे
किती निरागस हसू हसायचं ,
द्वेष,तिरस्कार तर दुरचीच गोष्ट
मन हे कटूतेने भरलेलं नसायचं.

गोडवा असणारे शब्द माझे
कुठे हरवून गेले ?
येतील का ते शब्द पुन्हा ओठांवर माझ्या
ह्या विचाराने अश्रृ ओघळून आले.

-


13 JUN 2020 AT 17:48

पुन्हा ती खेळणी
पुन्हा ते खेळ खेळायचेत...
पुन्हा ते मित्र
पुन्हा ती शाळा अनुभवायचीय...
पुन्हा तो शिक्षकांचा ओरडा
पुन्हा तो त्यांचा धडा शिकायचाय...
पुन्हा आईचं बोट धरून चालायचंय...
पुन्हा बाबांसोबत बाजारात फिरायचय...
मला पुन्हा ते बालपण जगायचंय....!!!

-