QUOTES ON #पहिलीभेट

#पहिलीभेट quotes

Trending | Latest
7 JUN 2018 AT 18:07

मनाला मोहवून ती गेली
अचानक भेट झाली आपली

-



त्याला भेटायला जायला झाला मला लेट
तोपर्यंत बिचारा करत बसला माझा वेट.😒😂

-


12 JUL 2021 AT 22:09

भेट पहीली अशी व्हावी आमची
पावसाच्या त्या सरीत चिंब भिजतांना
एकमेकांच्या नजरे ला नजर मिळताच
निःशब्द भावनांचा संवाद साधतांना.

भेट पहीली अशी व्हावी आमची
नकळत दोन मने एकमेकांशी जुळतांना
ना भेटलो कधी ना पाहीले कधी
तरीही दोघांची ओळख पटतांना

-


26 DEC 2020 AT 9:59

मित्र-मैत्रिणींची आयुष्यात आहेत खूप आठवणी
त्याच आठवणी पुन्हा उजळून आल्या
त्याच आठवणी आठवत
चालता-चालता लागली ठेच
तीच आपली पहिली भेट...
आयुष्य लहान आहे पण
त्या आठवणी खूप मोठ्या आहेत

-


26 DEC 2020 AT 10:47

चालता चालता लागली ठेच
तुझ्यात गुंतलो फक्त मीच
वाट भेटीची बदलली तूच
एकाकी चालत आहे मीच.

-


26 DEC 2020 AT 9:14

करारी नजरेचा तो बाणा,
रुतला काळजात थेट...

-


27 DEC 2020 AT 12:08

Thechi mule sharir dukhle,
Ani bheti mule wat chukle,
Chukle ase ki mn harwale,
Harwalele mn tujhya magech palale.

-


26 DEC 2020 AT 8:07

भेटीच्या नशेत झाला
कविमनाचा कवितांशी मेळ

-


26 DEC 2020 AT 9:01

चालता चालता पडली नजरेवर नजर...
स्मीत हास्याने खळी पडली गालावर...
Madhuri P. Warwatkar

-


25 JUL 2022 AT 13:11

पहिली भेट सांग मी, कशी विसरेन आपली...
मी पडतं असताना, तू मला सावरलेली...

ओढणी माझ्या खांद्यावर, ध्यान धरून तू टाकलेली...
लागलं का तुम्हाला? आठवते ओळ बोललेली...

न...नाही लागलं मला, मी जोर देऊन उद्दगारलेली...
बरं झालं तुमच्यामुळे, आज मी जिवंत राहिलेली...

त्यासाठीच कदाचित असावं, तू मला वाचवलेली...
आजन्माची जोडी तुझ्यासोबत, विधात्याने लिहिलेली...

सांग कशी विसरेन मी, पहिली भेट घडलेली...
दोघांना एकत्र आणण्यासाठी, वेळेनं घडवून आणलेली...

-