QUOTES ON #नारी_शक्ती

#नारी_शक्ती quotes

Trending | Latest

नारी शक्तीला समर्पित...म्हणतो
तरी पदोपदी, पुरुषी अहंकार डोकावतो
वेळ पाहून सत्कार कधीतरी,अन्
एरवी वासनेपोटी छेडाछेडी सुद्धा करतो

वावरते ती,कैक रुपात सभोवती
माता, भगिनी कधी लेक आपली म्हणतो
विसरून का मग, सर्व नातीगोती
समजून गरीब अबला शोषण करु पाहतो

राहिली ना तु आता गरीब अबला
होती कधी तु रणरागिणी इतिहास सांगतो
साक्षर तु नव युगाची खरी धाडसी
घातली गवसणी गगनाला, संसार जाणतो

-


13 MAR 2024 AT 18:03

भुवईची कमान, मध्ये कुंकू कपाळीला...
शोभे करारी बाणा, रंगरूपाला साजेसा...💖

-