नवीन...
नव्याचे नऊ दिवस म्हणतात
ते काही खोटं नाही...
अन् सरले ते नऊ दिवस
की लागतंच असं नवीन काही...
नव्याचे गहु, नव्याचा खाऊ
सदैव गोडवा नव्याचाच गाऊ...
ठेवा आठवणीत नव्याचे ते दिवस
घेऊन आभाळभर ओंजळ तरी देऊ...
विश्वाचा नियमच आहे,,,
स्वागत नेहमी नव्याचंच होतं
जुन्याला देऊन निरोप
जग गाणं नव्याचंच गातं...
-