सागरी तळमळलेला सावरकरांचा प्राण आहे तिरंगा
भगतसिंगच्या इन्किलाबमधला तो राष्ट्राभिमान आहे तिरंगा
गांधीजींच्या साध्या चरख्यात वसलेला स्वाभिमान आहे तिरंगा
बंकिमजींच्या आनंदमठातील गौरवशाली गुणगान आहे तिरंगा
राणी लक्ष्मीच्या तलवारीची तळपणारी धार आहे तिरंगा
कारगिलमध्ये दुश्मनाच्या छाताडावर केलेला जयजयकार आहे तिरंगा
लाल बाल पालची जहाल क्रांती आहे तिरंगा
सविनयची अहिंसक उत्क्रांती आहे तिरंगा
श्वासांच्या खेळात, हृदयाच्या स्पंदनांत,धमन्यांच्या गरम रक्तात आहे तिरंगा
फुलांपेक्षा सुंदर असेल तिरंगी आरास कारण आमुची अस्मिता आहे तिरंगा
-